डोंबिवलीत निवडणूक प्रचारादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन भागात भाजपकडून नागरिकांच्या घरी प्रत्येकी तीन हजार रुपयांची पाकिटे वाटली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू आहे. निवडणूक काळात उघड झालेल्या या प्रकारामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.