रक्षाबंधन असो किंवा इतर कोणत्याही सणांच्या दिवशी सर्वच महिला सुंदर आणि छान दिसायचं असत. सण उत्सवांच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, ड्रेस मटेरियल उपलब्ध असतात. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधन तुम्हाला स्टयलिश आणि सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही अनारकली ड्रेस घालू शकतात. सुंदर लुकसाठी अनारकली ड्रेस खूप छान दिसतील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यंदाच्या रक्षाबंधनला घालण्यासाठी काही अनारकली ड्रेसचे ऑपशन सांगणार आहोत, जे तुम्हाला नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य-instagram)
यंदाच्या रक्षाबंधनला स्टयलिश आणि सुंदर दिसण्यासाठी 'हे' अनारकली नक्की ट्राय करा
काहींना जास्त डिझाईन असलेले किंवा चावणारे कपडे आवडत नाही. अशावेळी तुम्ही कॉटनचे अनारकली ड्रेस घालू शकता. यामध्ये तुमच्या लुक सिंपल आणि क्लासी दिसेल.
बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनारकली ड्रेस उपब्ध झाले आहेत. त्यामध्ये नायरा कट, आलिया कट डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता.
सध्या सगळीकडे जुन्या साड्यांपासून नवीन ड्रेस तयार करण्याचा ट्रेंड आला आहे. या ट्रेंडला फॉलो करत तुम्ही सुद्धा साडीपासून बनवलेला ड्रेस रक्षाबंधनला घालू शकता.
इरकली किंवा खादी फॅब्रिकचा वापरून करून शिवलेले अनारकली ड्रेस खूप सुंदर दिसतात.हे अनारकली ड्रेस तुम्ही सणसमारंभांमध्ये घालू शकतात.
यंदाच्या रक्षाबंधनला तुम्ही साडीपासून तयार केलेले अनारकली ड्रेस स्टाईल करू शकता. १००० रुपयांच्या आतमध्ये अनारकली ड्रेस तयार करून मिळतो.