वसईच्या वालीव परिसरातील खान कॉम्प्लेक्स येथे लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद अचानक दोन गटांतील मोठ्या संघर्षात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला केवळ वादावादी झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हाणामारी झाली. या मारामारीदरम्यान अब्दुल रहमान खान यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खान कुटुंबीयांनी केली आहे