फॅशन डिजाइनर उर्फी जावेद तिच्या हटक्या फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. उर्फीविषयी असणारी चर्चा इतकी अनोखी आहे की त्या चर्चेला कधीच पूर्णविराम नसतो. कारण अगोदरची चर्चा संपण्याच्या अगोदरच बाई नवीन फॅशन प्रदर्शित करते. पॅपच्या नजरा नेहमीच उर्फीवर असतात.
उर्फीचा साडी लुक. (फोटो सौजन्य - Social Media)
फॅशन डिजाइनर उर्फी जावेदने @urf7i या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. उर्फीला साडीत पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
लाल रंगाची नक्षीदार काम असणाराही ही साडी दिसायला फार आकर्षक आहे. उर्फीच्या सौंदर्याच्या जादूने ते रूप आणखीन निखळ झाले आहे.
गळ्यात नेकलेस आणि कानात शोभिवंत दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. अभिनेत्रीने पोस्टखाली सुंदर असे कॅप्शन दिले आहे.
कॅप्शनमध्ये @sherinakapany @nonita_fashion या दोघांना साडीसाठी धन्यवाद करत @sheforchique ला साडी नेसण्यास मदत करण्यासाठी धन्यवाद दिले आहे.
उर्फीला पाहून चाहते मंडळी नक्कीच प्रेमात पडले आहेत, याची चाहूल कमेंट्समध्ये दिसून येत आहे.