Vaibhav Tatwawadi And Pooj Sawants Chal Ab Wahan Song Out Nrsr
वैभव तत्ववादी आणि पूजा सावंतचा ‘चल अब वहाँ’ गाण्यात रोमँटिक अंदाज
गेल्या काही दिवसांपासून वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) ही प्रेक्षकांची आवडती जोडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे दोघे नेमके कशासाठी एकत्र येणार याचा खुलासा मात्र झाला नव्हता. नुकतीच या दोघांनी ‘चल अब वहाँ’ (Chal Ab Wahan) या आपल्या आगामी रोमँटिक हिंदी साँग अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना ‘सरप्राइज’ दिलं आहे. नुकताच या अल्बमचा प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न झाला. मराठी रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी आता ‘चल अब वहाँ’ या ‘व्हिडीओ पॅलेस’ (Video Palace) निर्मित पहिल्या हिंदी अल्बममध्ये आपल्याला रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. ‘चल अब वहाँ’ अल्बममधील गाणं काश्मीरच्या निसर्गरम्य लोकेशन्सवर चित्रीत केलं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे तर काश्मीरचे नेत्रसुखद सौंदर्य दाखवण्याचे काम राष्ट्रीय पारितोषिक विजेते छायालेखक अमोल गोळे यांनी केले आहे. विदुर आनंद यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अब्दुल शेख यांचा स्वरसाज लाभला आहे.