दरवर्षीप्रमाणे यावर्षीची वटपौर्णिमा 21 रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यसाठी सुवासिनी महिला या दिवशी व्रत करून वडाच्या झाडाची पूजा करत असतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? वटपौर्णिमेच्या पूजेच्या ताटात पाच फळे का ठेवली जातात, नाही तर जाणून घ्या.

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व असते. हिंदू धर्मात सर्वात पवित्र सण म्हणून याकडे पहिले जाते

यादिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून एकमेकींना वाण देत असतात. वाण देण्याची प्रथा फार जुनी आणि पारंपरिक आहे

या वाणात पाच काळ्या मण्यांच्या माळीसह आंबा, जांभूळ, करवंद, फणस, केळ ही फळे दिली जातात

मात्र अनेकांना या वाणात ही पाच फळे का ठेवली जातात? मागील कारण माहित नसते

तर याचे मुख्य कारण म्हणजे ही फळे या हंगामातील मुख्य फळे आहेत, जी या हंगामातच पिकवली आणि विकली जातात. शिवाय ही फळे आरोग्यासाठीही फायदेशीर असतात

त्यामुळेच वाणात या फळांचा समावेश केला जातो. यादिवशी महिला या फळांव्यतिरिक्त इतर फळांचाही समावेश करतात






