हॉलिवूडमध्ये आपत्तीचे चित्रण करणाऱ्या चित्रपटांचा फार मोठा साठा आहे. हा साठा इतका विशाल आहे कि यामध्ये बेस्ट कोणतं? हे ठरवणे फार कठीण आहे. आपत्तीचे चित्रण करणाऱ्या काही चित्रपटांमध्ये त्सुनामीसारख्या महाकाय आपत्तीचे चित्रण करण्यात आले आहेत, तर काही चित्रपटांनीच इतर आपत्ती जसे कि हिमवादळ, चक्रीवादळ तसेच पूर सारखे आपत्तीचे चित्रण केले आहे.
टॉप 5 आपत्तीवर आधारित सिनेमे. (फोटो सौजन्य - Social Media )
टायटॅनिक (1997) हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. तसेच हा चित्रपट भारतात फार प्रसिद्ध आहे. या सिनेमात जगातील सर्वात मोठे जहाज हिमनगाला धडकून बुडाले. प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर ही भयानक आपत्ती दाखवण्यात आली आहे.
2012 हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला आहे. मुळात, या चित्रपटातील दृश्य सोशल मीडियावर बरेच व्हायरल आहेत. माया कॅलेंडरच्या भविष्यवाणीवर आधारित, हा चित्रपट पृथ्वीवरील निसर्गाच्या भयावह विध्वंसाचे दर्शन घडवतो. प्रलयामुळे मानवजातीला टिकण्यासाठी संघर्ष करताना दाखवले आहे.
द डे आफ्टर टुमारो (2004) हा चित्रपट हवामान बदलामुळे पृथ्वीवर आलेली नवीन हिमयुगाची भीषण परिस्थिती आणि त्यातून मानव कसा टिकतो, याची कथा. विशेषतः वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित भावनिक गोष्ट सांगतो.
सॅन अँड्रियास (2015) फार प्रसिद्ध सिनेमा आहे. अमेरिकेतल्या सॅन अँड्रियास फॉल्टवरील भूकंपावर आधारित हा चित्रपट एका वडिलांच्या संघर्षाची कथा सांगतो, जो आपल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रलयाचा सामना करतो.
डोंट लुक अप हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला आहे. एका उल्कापातामुळे पृथ्वी नष्ट होण्याच्या धोक्यावर आधारित हा चित्रपट विनोदी आणि गंभीर परिस्थितीचा मिश्रण आहे. विज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणाऱ्या परिणामांवर भाष्य करणारा सिनेमा आहे.