जर तुम्ही थ्रिलर ड्रामा चित्रपटांचे चाहते आहात तर हा सिनेमा नाही पाहिलात तर तुम्ही अजून काहीच नाही पाहिले. एक बाप त्याच्या मुलासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतो? याचे उदाहरण सांगणारे हे चित्रपट मल्याळम भाषेत आहे. या चित्रपटाचे नाव 'थुडारूम' आहे. जिओ हॉटस्टारवर हे चित्रपट उपल्बध आहे.
नक्की काय आहे Thudarum Movie ची गोष्ट? (फोटो सौजन्य - Social Media)
थुडारूम या चित्रपटात सुरुवातीला एक छान मध्यमवर्गीय कुटुंब दाखवलं जातं. आई वडील त्यांच्या दोन मुले! वडिलांची एक गाडी असते ज्याच्या माध्यमातून त्यांचे घर चालत असते.
पुढे, त्यांच्या नशिबात वळण येते. पोलीस त्यांच्या वर्दीचा माज करत, त्या व्यक्तीला खोट्या खुनाच्या आरोपात फसवतात.
नंतर त्या व्यक्तीला कळून येते की ज्याचा खून झाला आहे तो त्याचाच मुलगा आहे. मग खून केलेल्या पोलिसांना तो कशी शिक्षा देतो?
हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला 'थुडारूम' हा सिनेमा पाहावा लागणार आहे. अडीच तसंच चित्रपट आहे.
प्रसिद्ध स्टार मोहनलाल तसेच थॉमस मॅथ्यू या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसून आले आहे.