महाराष्ट्रातील सण, समारंभ किंवा कोणत्याही कार्यक्रमात अतिशय आवडीने नऊवारी साडी नेसली जाते. नऊवारी साडी नेसून त्यावर सुंदर सुंदर दागिने परिधान केल्यास मराठमोळा लुक दिसतो. हल्लीच्या बदलत्या फॅशनच्या युगात जुनी परंपरा नव्याने जपली जात आहे. लग्नाच्या दिवशी नवी नवरी नऊवारी साडी नेसून छान तयार होते. मात्र बऱ्याचदा लग्नात कोणत्या पॅटर्नची नऊवारी साडी नेसावी? असे अनेक प्रश्न पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नऊवारी साडीचे काही सुंदर प्रकार सांगणार आहोत. या पद्धतीने तुम्ही नऊवारी साडी नेसल्यास तुमचा लुक अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसेल. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्न समारंभात परिधान करा 'या' पॅटर्नच्या सुंदर नऊवारी साडी
लग्नात इतरांपेक्षा सुंदर आणि उठावदार लुक दिसण्यासाठी नववधू वेगवेगळ्या बॉर्डर असलेल्या नऊवारी साड्यांची निवड करते.साडीवर मोठ्या बॉर्डरमुळे नवरीचा साज अधिक चांगला उठून दिसतो.
बाजारात कॉटनच्या साड्यांना खूप जास्त मागणी आहे. कारण अजूनही अनेक स्त्रिया दैनंदिन वापरात नऊवारी साडी नेसतात. त्यामुळे तुम्ही खण नऊवारी किंवा ओरिजिनल कॉटनची नऊवारी साडी नेसू शकता.
लग्नात तुम्ही पेशवाई पद्धतीने नेसवलेली नऊवारी साडी नेसू शकता. सुरूवातीच्या काळामध्ये पेशवाई नऊवारी साडी नेसण्यासाठी भरजरी साड्यांचा वापर केला जायचा. या साडीच्या काठाचा वापर करून सुंदर पद्धतीने नऊवारी साडी नेसली जाते.
हल्ली नऊवारी सिल्क साड्यांना नववधूसाठी मोठी मागणी आहे. सिल्क साड्या अंगावर अतिशय चापून चोपून बसतात. पूर्वीच्या काळी लावणी नृत्यासाठी विशिष्ट काठापदराच्या साडीचा उपयोग केला जायचा.
पारंपरिक नऊवारी साड्या हल्ली बॉलीवूड कनेक्शनमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या सिल्क आणि शिफॉन फॅब्रिकचा वापर करून त्यावर मोती आणि मण्यांचे नक्षीकाम करून सुंदर साडी तयार केली जाते. या साडीला बाजारात मोठी मागणी आहे.