वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आराम
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सतत वाढलेल्या तणावामुळे आणि कामामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवते. डोकेदुखी अतिशय सामान्य समस्या आहे. पण यामुळे काहीवेळा उलट्या, अस्वस्थता वाढू लागते. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे सुद्धा डोकं दुखत. कामावर लक्ष केंद्रित करताना अनेक अडथळे निर्माण होतात. वारंवार होणारे डोकेदुखी कमी करण्यासाठी अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण पेनकिलरच्या गोळ्यांमुळे किडनी निकामी होणे किंवा किडनीच्या आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर मानेमध्ये वेदना होतात. याशिवाय शरीरात निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. याशिवाय तासनतास मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप, झोपेचा अभाव, चुकीचा आहार इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावर होतो आणि डोकं दुखू लागते. शरीरात जमा झालेल्या पित्तामुळे डोकं दुखणे, उलट्या होणे किंवा मळमळ वाटू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वारंवार होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे तात्काळ डोकेदुखीपासून आराम मिळेल आणि शरीराला सुद्धा फायदे होतील.
डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होते आणि शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. तसेच आल्याचे चाटण खाल्ल्यास डोकेदुखीपासून सुटका मिळेल. यासाठी किसलेल्या आल्याचा रस काढून त्यात मध मिक्स करा आणि आल्याचे रसाचे सेवन करावे. नंतर काही वेळाने कोमट पाण्याचे सेवन केल्यास डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळेल. आलं मधाचे चाटण खाल्ल्यानंतर जड झालेले डोकं हलके होते. यामुळे डोक्याच्या स्नायूंना आराम मिळतो.
डोकेदुखीवर अतिशय प्रभावी उपाय म्हणजे गरम पाण्याची पट्टी. ही पट्टी मान आणि डोक्याच्या मागच्या बाजूला बांधून ठेवा. यामुळे मानेचे आखडलेले स्नायू रिलॅक्स होण्यास मदत होईल. गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेतल्यामुळे रक्ताभिसरण सुधारून तणाव कमी होतो. धावपळीच्या जीवनशैलीमुळे काहीवेळा व्यवस्थित झोप पूर्ण होत नाही. झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शांत आणि आरामदायी झोप घेणे आवश्यक आहे. डोके दुखी केवळ डॉक्टरांच्याबी गोळ्या औषधांची नाहीतर घरगुती उपाय करून सुद्धा बरी होते. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेतल्यास डोकेदुखीची समस्या कायमची दूर होईल.