फोटो सौजन्य - Social Media
रावण हा राक्षस कुळातील फार महत्वाचा राजा मानला गेला आहे. तसा तो बुद्धीने विद्वान पण अहंकाराने वेढलेला असा पुराणांमध्ये नमूद आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? रावणाला इतिहासात दहा मुंडकी असणारा दाखवला गेला आहे. पण खरंच? रावणाला दहा मुंडकी होते का? त्याला ते मुंडकी कुठून प्राप्त झाले? या सगळ्या बाबींवर विश्लेषकांचे मत विविध आहेत. कुणी म्हणत, त्याला शारीरिक रित्या दहा डोकी प्राप्त होती. तर कुणी म्हणतं, त्याला दहा मुंडकी निव्वळ विशेषण म्हणून वापरले गेले आहेत. पण नक्की काय आहे म्हणणं, जाणून घेऊयात.
रावण जरी अधर्मी असला तरी तरी त्याने धर्माचे कार्य करण्यात कधीच मागे हटला नाही. त्याची शंकर भक्ती जगव्याख्यात आहे. भगवान शंकराला तप करून प्रसन्न करत त्याने अपार विद्या प्राप्त केली होती. काही लोकांचे म्हणणे आहे की रावणाला एकच मुंडका होता पण त्याच्याकडे असणाऱ्या सामर्थ्यामुळे त्याला दशमुख अशी उपाधी देण्यात आली होती. तर काही लोकांनी रावणाच्या दहा मुंडक्यांना त्यांच्या अंगातील दोष म्हणून पाहिले आहे. ते दशदोष त्याच्या दशमुखांना दर्शवतात. क्रोध, अहंकार, मोह, लोभ, मत्सर (जळफळाट), कामवासना, मद (दारू/अहंभाव), ईर्ष्या, अन्याय, हिंसा हे ते दशदोष आहेत, जे त्याच्यात भरभरून होते.
काही विद्वानांच्या मते रावण हा अत्यंत विद्वान होता. वेद, शास्त्र, ज्योतिष, वैद्यक, संगीत अशा दहा वेगवेगळ्या विद्या व शास्त्रांमध्ये त्याने प्रावीण्य मिळवले होते. म्हणून त्याला दहा मुख असलेला विद्वान असं म्हटलं गेलं. म्हणजेच रावणाची दहा डोकी कुठून आली हा प्रश्न बघता, ती शारीरिक नसून प्रतीकात्मक होती: त्याच्या दहा गुण-दोषांचे, दहा विद्वत्तांचे आणि त्याच्या सामर्थ्याचे प्रतिक म्हणून.
काही अभ्यासकांच्या मते, रावणाची उंची, त्याची विशाल बुद्धी आणि त्याचा प्रचंड अहंकार पाहून कवी-लेखकांनी त्याला दहा डोकी असल्याचं वर्णन केलं. पाहायला गेले तर वेगवेगळ्या ठिकाणी, याविषयी संदर्भ वेगवेगळे आहेत.