आज आम्ही तुम्हाला जैन धर्मातील एका अशा प्रथेविषयी माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे 3 वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर प्रत्येकजण या प्रथेविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. संथाराला सल्ल्खाना अथवा समाधी मृत्यू असेही म्हटले जाते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे ब्रेन ट्यूमरने ग्रस्त असलेल्या वियाना जैन नावाच्या तीन वर्षांच्या मुलीसोबत या प्रथसंबंधित एक विचित्र घटना घडून आली, ज्यानंतर ही प्रथा एक चर्चेचा विषय बनली. चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे जैन धर्मातील संथारा प्रथा, ज्यामुळे 3 वर्षांच्या मुलीने गमावला आपला जीव...
संथारा हा जैन धर्मात केला जाणारा एक पवित्र उपवास आहे ज्यामध्ये व्यक्ती हळूहळू अन्न आणि पाणी सोडून देते आणि आध्यात्मिक त्यागाने मृत्यूला आलिंगन घालते
संथारा, ज्याला सल्लेखाना असेही म्हटले जाते, ही जैन धर्माची एक प्राचीन आणि आध्यात्मिक परंपरा आहे, ज्यात व्यक्ती स्वेच्छेने अन्न आणि पाण्याचा त्याग करते आणि शांतीपूर्ण मृत्यूकडे वाटचाल करु लागते
याला आत्महत्या मानले जात नाही तर जैन धर्मात याला मोक्ष मिळवण्यासाठीची एक आध्यात्मिक साधना मानली जाते. ही प्रथा सहसा वृद्ध किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांद्वारे केले जाते, जेव्हा त्यांना वाटते की आता त्यांचे शरीर धार्मिक कार्यासाठी योग्य राहिले नाही
मध्य प्रदेशातील वियाना जैन ही तीन वर्षांची मुलगी ब्रेन ट्यूमरने ग्रस्त होती. अनेक उपचार केल्यानंतरही विनाया स्थिर होऊ शकली नाही, ज्यानंतर तिच्या कुटुंबाने संथारा प्रक्रियेचा अवलंब केला. संथारा सुरु केल्याच्या अवघ्या 10 मिनिटांतच वियानाने आपला जीव दिल्याचे सांगितले जाते
सर्वात कमी वयात संथारा करणारी मुलगी म्हणून विनाया जैनचे नाव 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये दाखल करण्यात आलं