आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीची चर्चा सध्या जगभरामध्ये सुरु आहे. यंदा २०२५ चे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. परंतु भारतीय संघाचे सर्व सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये ८ संघ सहभागी झाले आहेत. २०२५ चा आयसीसी चॅम्पियन कोण होणार हे ९ मार्च रोजी जगाला कळेल. परंतु चॅम्पियन ट्रॉफीच्या इतिहासामध्ये कोणते संघ विजेते झाले आहेत यावर एकदा नजर टाका.
नजर टाका चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद जिंकलेल्या सदस्यांवर - फोटो सौजन्य - सोशल मीडिया
१९९८ मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची पहिली आवृत्ती बांगलादेशमध्ये खेळवण्यात आली होती. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये फायनाचा सामना झाला होता. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा ४ विकेटने पराभव करून जेतेपद नावावर केले होते. फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफीची दुसऱ्या आवृत्तीची योजना २००० मध्ये करण्यात आली होती. यामध्ये दुसऱ्या सीझनचे जेतेपद न्यूझीलंडच्या संघाने जिंकले होते. विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडने भारताचा ४ विकेट्स राखून पराभव केला. फोटो सौजन्य - ICC वेबसाईट
२००२ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा दुसरा सिझन झाला होता. या स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेमध्ये करण्यात आले होते. त्या वर्षी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. वास्तविक, पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
२००४ मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले होते. यावेळी चॅम्पियन ट्रॉफी वेस्ट इंडिजच्या संघाने नावावर केली होती. रोमहर्षक फायनलमध्ये वेस्ट इंडिजने यजमान इंग्लंडचा २ गडी राखून पराभव केला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा हंगाम २००६ मध्ये भारतात झाला. त्यानंतर जेतेपदाच्या लढतीत वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
२००९ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीही ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. स्पर्धेचा सहावा मोसम दक्षिण आफ्रिकेत झाला. ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडचा ६ विकेटने पराभव केला होता. सलग दोन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे. फोटो सौजन्य - ICC फेसबुक
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये खेळलेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताने अंतिम फेरीत इंग्लंडचा ५ धावांनी पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, संयुक्त विजेते असूनही जेतेपद पटकावणारा भारत हा या स्पर्धेतील एकमेव संघ आहे. फोटो सौजन्य - ICC
चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवी आवृत्तीही इंग्लंडमध्येच झाली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेतेपदाची लढत झाली. पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव करून पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली.