टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये कमी पहिला जात होता आणि त्यामुळे टीआरपीवर देखील त्याचा परिणाम पाहायला मिळाला. आता या शोचा नववा आठवडा आहे आणि सध्या शोमधील सदस्यांना प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. त्याचबरोबर शोच्या टीआरपीचा ग्राफ देखील वाढत चालला आहे. काल विकेंडच्या वॉरचा एपिसोड झाला. याचदरम्यान बिग बॉस १८ मध्ये टॉप-5 च्या शर्यतीमध्ये कोणते खेळाडू आहेत यावर एकदा नजर टाका.
बिग बॉस १८ मध्ये टॉप ५ च्या शर्यतीत असलेले स्पर्धक. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
इंस्टाग्राम इंफ्लूसर रजत दलाल सुद्धा या शर्यतीमध्ये टिकून आहे. सध्या तो घरामध्ये चर्चेत असलेला स्पर्धक आहे त्याचे आणि दिग्विजयचे भांडण या आठवड्यामध्ये बरेच गाजले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजेच करणवीर मेहरा. नुकताच त्याने खतरो के खिलाडीचा खिताब जिंकला आहे. आता बिग बॉसचे प्रेक्षक देखील त्याला भरपूर प्रेम देत आहेत. कालच्या भागामध्ये सुद्धा त्याच्यावर फराह खानने कौतुकाचा वर्षाव केला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
या यादीमध्ये बिग बॉसच्या घरामधील एकच महिला सदस्य टॉप ५ चा भाग आहे ती म्हणजेच चाहत पांडे. सध्या तिला शोमध्ये कमी स्क्रीन टाइम दिले जात आहे पण तिला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
या यादीमध्ये अविनाश मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे, त्याला सुद्धा प्रेक्षकांची पसंत मिळत आहे. आता पुढील आठवड्यामध्ये त्याचा खेळ कसा असेल हे पाहणं मनोरंजक ठरेल. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता विवियन डिसेना आहे सुरुवातीलाच त्याला लाडला घोषित करण्यात आले परंतु आता त्याला करणवीर मेहरा कडवी टक्कर देताना दिसत आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया