Commercial LPG Cylinder Price Hike: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिवाळी काही दिवसांवर आली असतानाच एक वाईट बातमी आली आहे. पुन्हा एकदा गॅसच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात 10 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटवाल्यांचा खर्च वाढणार असून बाहेर जेवण महाग होण्याची शक्यता आहे. Commercial LPG Cylinder Price Hike:
दिल्लीमध्ये आता 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत 2,820 रुपये झाली आहे. काही आठवड्यांपूर्वीच या सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या, पण आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मात्र, एक चांगली गोष्ट म्हणजे घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे घरात स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींना तरी दिलासा मिळाला आहे.
तुम्हाला आठवत असेल, 1 मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 1000 रुपयांची मोठी वाढ झाली होती. त्यावेळी 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 993 रुपयांनी वाढून थेट 3000 रुपयांच्या वर गेली होती. सगळे व्यापारी हवालदिल झाले होते. त्यानंतर एकदा किंमत थोडी कमी करण्यात आली होती. लोकांना वाटलं आता दर स्थिर राहतील, पण दिवाळीच्या तोंडावर पुन्हा 10 रुपयांची वाढ करण्यात आली.
काय सांगता… आता नवीन गॅस कनेक्शन मिळणार नाही? e-KYC न केल्यामुळे LPG लाभार्थ्यांची संख्या घटली
10 रुपये वाटायला कमी वाटत असले तरी हॉटेल व्यवसायासाठी तो मोठा खर्च आहे. एका मोठ्या हॉटेलमध्ये दिवसाला 10-15 सिलिंडर लागतात. त्यामुळे महिन्याचा खर्च 3000-4000 रुपयांनी वाढतो. हा खर्च शेवटी ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. त्यामुळे सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण, सगळं बाहेर खाणं महाग होणार आहे.
तेल कंपन्यांनी सगळ्या मोठ्या शहरांचे नवीन दर जाहीर केले आहेत. सगळीकडेच जवळपास 10 रुपयांची वाढ झाली आहे.
LPG Rate Today: LPG Rate वाढला? महाराष्ट्रात गॅस सिलेंडरचे आजचे दर पाहून धक्का बसेल!
सध्या घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ न केल्यामुळे तरी थोडा दिलासा आहे. पण व्यावसायिक दरात सातत्याने होणारी वाढ पाहता, येणाऱ्या काळात बाहेरचं खाणं अजून महाग होणार हे नक्की. दिवाळीच्या सणात गोडधोड बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाबरोबरच आता हॉटेलचे बिल पण वाढणार आहे.






