Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: महायुतीत राडा! शिवसेना-भाजपचे 100 कार्यकर्ते एकमेकांना भिडले अन्…

गाडी अंगावर घातल्याच्या रागातून हा वाद सुरू झाला. यावेळी भाजपाचे विशाल परब यांचा चालक अमरीश यादव (रा. चराठे) याला मारहाण करण्यात आली व त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 05, 2025 | 12:16 PM
Maharashtra Politics: महायुतीत राडा! शिवसेना-भाजपचे 100 कार्यकर्ते एकमेकांना भिडले; कोकणात तणाव वाढला

Maharashtra Politics: महायुतीत राडा! शिवसेना-भाजपचे 100 कार्यकर्ते एकमेकांना भिडले; कोकणात तणाव वाढला

Follow Us
Close
Follow Us:

सावंतवाडीत शिवसेना आणि भाजपा असे दोन गट एकमेकांना भिडले
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
अंगावर धावून जाणे व शिवीगाळप्रकरणी गुन्हा

सावंतवाडी: मतदानाच्या पार्श्वभूमीवर गाडी अंगावर घालण्याच्या कारणावरून सावंतवाडी येथील वनविभागाच्या समोरील परिसरात शिवसेना आणि भाजपाच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी १०० हून अधिक जणांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हा सर्व प्रकार तब्बल दीड ते दोन तास सुरू होता, त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून व पोलिसांनी स्वतःहून असे मिळून तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमरीश यादव (विशाल परबांचे चालक) यांच्या तक्रारीवरून धक्काबुक्की, मारहाण आणि गाडी अडवल्याप्रकरणी. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक पदाचे उमेदवार संजू परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, अॅड. नीता सावंत कविटकर नगरसेवक पदाचे उमेदवार अजय गोंदावळे तसेच क्लेटस फर्नाडिस ज्ञानेश्वर पाटकर प्रफुल्ल गोंदावळे आदी वगैरे २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

गाडी अंगावर घातल्याच्या रागातून हा वाद सुरू झाला. यावेळी भाजपाचे विशाल परब यांचा चालक अमरीश यादव (रा. चराठे) याला मारहाण करण्यात आली व त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतरदोन्ही गटांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पोलिस ठाण्यात बाचाबाची झाले, एकमेकांना खुन्नस देण्याचा प्रकार घडला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, याप्रकरणी सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण तर उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी उपलब्ध तक्रारी व माहितीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अंगावर धावून जाणे व शिवीगाळप्रकरणी गुन्हा

याबाबतची तक्रार ज्ञानेश्वर पाटकर यांनी दिली असून या तक्रारीमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपाचे उमेदवार अॅड. अनिल निरवडेकर नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्यासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार २ डिसेंबरला झालेल्या नपच्या मतदानावेळेस सावंतवाडीतील वनविभाग ऑफिस कार्यालयाच्या परिसरात शिवसेना व भाजपाचे दोन गट भिडले होते.

Nilesh Rane : नितेश विरुद्ध निलेश! मालवण कॅश प्रकरणावरुन राणे बंधूंमध्ये पेटलं वाकयुद्ध

पोलिसांकडून दाखल झालेला गुन्ह्यांमध्ये मनाई आदेशाचा भंग करून पोलिस ठाण्यात बेकायदा जमाव करणे, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे व शिवीगाळ करणे. गुन्हा दाखल असलेले प्रमुख संशयित शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटकर, क्लेटस फर्नाडिस व भाजपाचे कार्यकर्ते अमित परब यांच्यासह ४० ते ५० अज्ञातांवर गुन्हा दाखल कसायात आला आहे.

Web Title: 100 shiv sena and bjp workers beaten up in sawantwadi conflict in mahayuti fadnavis shinde maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • BJP
  • Konkan
  • Mahayuti
  • shivsena

संबंधित बातम्या

ममता सरकार कोसळणार? ‘या’ बड्या नेत्याने व्यक्त केली भीती; पश्चिम बंगालसाठी आरपारची लढाई
1

ममता सरकार कोसळणार? ‘या’ बड्या नेत्याने व्यक्त केली भीती; पश्चिम बंगालसाठी आरपारची लढाई

Kangana Ranaut on Rahul Gandhi: “अटलजींसारखे बनायचे असेल तर, तुम्हीही भाजप…” कंगना रनौत यांचा राहुल गांधीना आश्चर्यकारक सल्ला
2

Kangana Ranaut on Rahul Gandhi: “अटलजींसारखे बनायचे असेल तर, तुम्हीही भाजप…” कंगना रनौत यांचा राहुल गांधीना आश्चर्यकारक सल्ला

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला
3

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला

Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुतीतील दुरावा वाढला? BJP ने पुन्हा एकनाथ शिंदेंकडे केला काणाडोळा, इशाराही टाळला
4

Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुतीतील दुरावा वाढला? BJP ने पुन्हा एकनाथ शिंदेंकडे केला काणाडोळा, इशाराही टाळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.