Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raghav Chadha News : “राज्यसभेत सामोसा अन् पिझ्झावर बोलत बसले…; AAP च्या नेत्यांची राघव चड्ढांवर आगपाखड

राज्यसभा गाजवणारे आणि जनतेमध्ये नेहमी चर्चेत असलेले राघव चड्ढा यांना आपने उपनेते पदावरुन काढून टाकले आहे. यानंतर आपमधील नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 03, 2026 | 05:22 PM
AAP Punjab CM Bhagwant Mann and Atishi Marlena react to the Raghav Chadha case

AAP Punjab CM Bhagwant Mann and Atishi Marlena react to the Raghav Chadha case

Follow Us
Follow Us:

Raghav Chadha News : नवी दिल्ली : आम आदमी पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. खासदार राघव चड्ढा यांच्याविरोधात पक्षातून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. राज्यसभा गाजवणारे आणि जनतेमध्ये नेहमी चर्चेत असलेले राघव चड्ढा यांना आपने उपनेते पदावरुन काढून टाकले आहे. या कारवाईनंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत जनतेसाठी आवाज उठवणे हे काय पाप आहे का असा प्रश्न आप वरिष्ठांना केला. यावरुन आता आपमधील (AAP) सर्व नेत्यांनी राघव चड्ढा यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.

आप नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खासदार राघव चड्ढांवर निशाणा साधला. मान म्हणाले की, “पक्षाच्या संसदीय मंडळाचे नेते वेळोवेळी बदलतात आणि ही एक सामान्य प्रक्रिया आहे. स्वतःचे उदाहरण देत ते म्हणाले की, २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनीही डॉ. धर्मवीर गांधी यांची जागा घेतली होती. असे अनेक गंभीर मुद्दे आहेत ज्यावर खासदारांनी सभात्याग करावा किंवा आवाज उठवावा अशी पक्षाची अपेक्षा असते, अशी प्रतिक्रिया भगवंत मान यांनी दिली.

हे देखील वाचा : “राघव, तुम्ही घाबरलेले..PM मोदींच्या विरोधात बोलायला घाबरता; AAP नेत्याने सगळंच काढलं बाहेर

पुढे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, “जेव्हा एखादा खासदार असे करण्यात अपयशी ठरतो, तेव्हा ते व्हीपचे उल्लंघन ठरते. व्हीपचे उल्लंघन केल्याबद्दल नंतर कारवाई केली जाते. पश्चिम बंगालमधील मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्याचा मुद्दा असो किंवा गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची अटक असो, राघव चड्ढा यांनी त्याऐवजी संसद कॅन्टीनमधील समोशांच्या वाढत्या किमती आणि पिझ्झा डिलिव्हरीला होणारा विलंब हे मुद्दे उपस्थित केले. मला वाटते की ते तडजोड करण्यास तयार नाहीत.” अशी प्रतिक्रिया भगवंत मान यांनी दिली. यामुळे आप पक्षामध्ये राघव चड्ढा यांच्याविरोधात वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

हे देखील वाचा :  Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या अतिशी यांनी देखील चड्ढा यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, राघव चड्ढा हे पंतप्रधान मोदींच्या मांडीवर बसले आहेत. चड्ढा कोणत्याही मुद्द्यावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलण्यास घाबरतात. अतिशी म्हणाल्या की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने आणलेल्या महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास चड्ढा यांनी नकार दिला. विरोधी पक्षांनी सभात्याग केला तेव्हा ते सभागृहात बसून राहिले, अशी प्रतिक्रिया आतिशी यांनी देखील दिली आहे. त्यामुळे खासदार राघव चड्ढा यांच्याविरोधात आम आदमी पक्षामध्ये वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Aap punjab cm bhagwant mann and atishi marlena react to the raghav chadha case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • AAP
  • AAP Arvind Kejriwal
  • Atishi Marlena
  • Bhagwant Mann
  • Raghav Chadha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.