
Abhijeet Dipke, CJP Protest, Shivaji Park Student protest,
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सीजेपीच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. आजचे मुंबईतील ‘सीजेपी’चे आंदोलन संपले असून, आता दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बोलताना दीपकेंनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
मुंबई कधीही मागे राहत नाही. जंतरमंतरपेक्षा हे आंदोलन कमी नाही. जय जवान जय किसान ही लाल बहादूर शास्त्री यांनी घोषणा दिली होती. सध्या देशातील तरुण जागे झाले आहेत. लोकशाहीला वाचविण्यासाठी ही मोहिम सुरू ठेवू, असे महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी म्हटले.
सीजेपीच्या आंदोलनात अभिनेत्री शबाना आझमी म्हणाल्या, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत, मी मुंबईची असल्यामुळे, तुम्हा सर्वांना इथे इतक्या मोठ्या संख्येने पाहून मला खूप आनंद होत आहे. आपले मत हा आपला हक्क, आपला आवाज अहे. जेव्हा आपली नावे मतदार यादीतून काढली जातील, तेव्हा आपण काय करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेला भेट देत असतात, तेव्हा अनेकदा म्हटले जाते की ते गांधींच्या देशातून आले आहते. महात्मा गांधी हे या देशाचे आत्मा आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कणा तर पं. जवाहरलाल नेहरू मेंदू आहेत, असे मत काँक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके म्हणाले, तसेच त्यांनी भाजपवर टीका करत ‘एक देश, एक निवडणूक ही केवळ घोषणा असून, प्रत्यक्षात भाजपला ‘एक देश, एक पक्ष’ हवा आहे, असा आरोप केला.
मुंबई पोलिसांनी आमच्या आंदोलनाला शांततापूर्ण परवानगी दिली, मुंबई फक्त एक ट्रेलर आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, आम्ही अंतिम सामना जंतर मंतरवर खेळू, असे दीपके म्हणाले. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सीजेपीच्यावतीने जेलभरो आदोलन करण्यात आले असून सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ज्ञानेश कुमार राजीनामा द्या अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.
अभिजीत दिपकेच्या आजच्या आदोलनात अभिनेते नसरुद्दीन शाह आणि शर्लिन चोपडा यांनीही सहभागी होत पाठिंबा दिला आहे. यावेळी, नसरुद्दीन शाह यांनी दिपकेंचे कौतुक केले, तर मी आपला मोठा फॅन आहे, असे अभिजीत दिपकेंनी यावेळी म्हटले,
कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज शिवाजी पार्क परि सीईसी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. आआंदोलना मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्क परिसरात तरुणांची गर्दी झाली आहे. संगीतकार विशाल ददलानीदेखील या आंदोलनात सहभागी झाले. निवडणूक आयोगाने माझाही अर्ज बाद असे ते म्हणाले. जंतरमंतरच्या आंदोलनानंतर पुन्हा शिवाजी पार्कमध्ये सहभागी झार गीतकार-संगीतकार विशाल ददलानी यानी गाणे म्हागत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा मागणी केली. यावेळी त्यांनी ‘मेरा रंग दे बसंती चोला’ असे म्हटले.