Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain News : दोन दिवसाच्या अवकाळीने पुणं तुंबलं! खरं कारण काय? आदित्य ठाकरेंनी केला पर्दाफाश

पुण्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून सामान्य लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. यावरुन माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 05, 2026 | 12:51 PM
Aditya Thackeray Social Media Post on Pune City Flooding Due to Unseasonal Rains

Aditya Thackeray Social Media Post on Pune City Flooding Due to Unseasonal Rains

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहराचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान
  • आदित्य ठाकरेंनी केली सोशल मीडिया पोस्ट
  • पुण्यातील रस्ते तुंबण्याचे सांगितले कारण
Aditya Thackeray on Pune Rain : पुणे : पुणे शहरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. एक एप्रिल व दोन एप्रिल रोजी झालेल्या तुफान पावसामुळे पुणे शहर (Pune News) तुंबले होते. रस्त्यांना नाल्यांचे स्वरुप आले होते. सर्वत्र गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था आणि संपूर्ण शहर विस्कळित झाले. वकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेती व नागरी भागात मोठे नुकसान झाले आहे. यावरुन पुण्यातील विकासकामांवर जोरदार टीका केली जात आहे. या घटनेची कारणे आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Adtiya Thackeray) यांनी स्पष्टपणे सांगितली आहेत.

 

 

पुण्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून सामान्य लोकांना याचा मोठा फटका बसला आहे. यावरुन माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी महायुती सरकारवर आणि पुण्यामध्ये अतिक्रमण करुन केलेल्या विकासकामांवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी लिहिले आहे की. “पुण्यात काल झालेला पाऊस ‘क्लाऊडबर्स्ट’ किंवा ४ तासांत झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता; मात्र ह्या पावसाने प्रशासनाचे अपयश अधोरेखित केले,” अशी टीका त्यांनी केली.

हे देखील वाचा : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

चुकीच्या ठिकाणी उभारलेले मेट्रो खांब

आदित्य ठाकरेंनी पुढे लिहिले आहे की, “पाण्याच्या तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नव्हती. त्यामागचे मूळ कारण म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून सरकार आणि सत्ताधाऱ्यांनी पर्यावरणीय धोक्याच्या चिन्हांकडे केलेले सातत्यपूर्ण दुर्लक्ष! मागील ४ वर्षांपासून पर्यावरण तज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरीक सातत्याने विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत. अशा अव्यवहार्य प्रकल्पांमध्ये, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, चुकीच्या ठिकाणी उभारलेले मेट्रो खांब, नदीपात्रातील अतिक्रमणे, नदीच्या रेड आणि ब्लू फ्लड लाईन्समध्ये केलेले बदल आणि वेताळ टेकडीच्या नाशाचा प्रस्ताव  हे सर्व मुद्दे वारंवार मांडण्यात आले आहेत,” अशी सर्व कारणे आदित्य ठाकरेंनी सांगितली.

पुण्यात काल झालेला पाऊस ‘क्लाऊडबर्स्ट’ किंवा ४ तासांत झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता; मात्र ह्या पावसाने प्रशासनाचे अपयश अधोरेखित केले. पाण्याच्या तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नव्हती. त्यामागचे मूळ कारण म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून… — Aaditya Thackeray (@AUThackeray) April 3, 2026

हे देखील वाचा :  उन्हाळा की पावसाळा? Pune शहरात हवामानाचा लपंडाव; पुढील दोन दिवसांत….

‘विकास’ नावाखाली केवळ मृगजळ दाखवले

तसेच, “मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, फक्त काँक्रीट ओतणे म्हणजे विकास नाही. गेल्या दशकभरापासून पुण्यात ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असूनही, हा कथित विकास प्रत्यक्षात संकटच ठरत आहे. जर हा तथाकथित विकास असाच सुरू राहिला, तर पुण्याला अशा परिस्थितींना अनेकदा सामोरे जावे लागेल आणि ‘विकास’ नावाखाली केवळ मृगजळ दाखवले जाईल. २०२१ मध्ये पर्यावरण मंत्री म्हणून, मी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट थांबवून तो पुण्याच्या गरजेनुसार पुन्हा आखण्याचे निर्देश दिले होते. नदीच्या नैसर्गिक व मूळ रेड- ब्लू फ्लड लाईन्स पुन्हा निश्चित करणे अत्यावश्यक आहे, सलीम अली पक्षी उद्यान पुनर्जीवित केले होते, जे आज पुन्हा ढिगाऱ्यांनी भरले जात आहे. वेताळ टेकडी आणि इतर मोकळ्या जागांचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे याबाबात निर्णय आता आपल्या हातात आहे आणि त्याच्या परिणामाची झलक काल पुणेकरांनी प्रत्यक्ष अनुभवली आहे!” असे स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे. पुणे शहराच्या झालेल्या या अवस्थेवरुन त्यांनी महायुती सरकारला धारेवर धरले.

Web Title: Aditya thackeray social media post on pune city flooding due to unseasonal rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • pune news
  • Rain Update

संबंधित बातम्या

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क
1

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क

Maharashtra Breaking News Today 2026: पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता
2

Maharashtra Breaking News Today 2026: पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
3

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी
4

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.