Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच उतरले रस्त्यावर; पाण्यात बसून आंदोलन, मग महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवतंय?

मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसानंतर अनेक सखल भाग जलमय झाल्याने महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे जलभरावाच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक साचलेल्या पाण्यात उतरून आंदोलन करत नालेसफाईतील हलगर्जीपणावर कारवाईची मागणी करत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 04, 2026 | 04:31 PM
सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच उतरले रस्त्यावर; पाण्यात बसून आंदोलन, मग महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवतंय?

सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच उतरले रस्त्यावर; पाण्यात बसून आंदोलन, मग महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवतंय?

Follow Us
Follow Us:
  • सत्ताधारी भाजपचे नगरसेवकच उतरले रस्त्यावर
  • पाण्यात बसून आंदोलन
  • मग महापालिकेचा कारभार नेमका कोण चालवतंय?
विजय काते, मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले, रस्ते तासन्तास पाण्याखाली गेले आणि नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे या परिस्थितीविरोधात विरोधी पक्ष नव्हे, तर सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक रस्त्यावर उतरून साचलेल्या पाण्यात बसत आंदोलन करताना दिसले.

भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात काही तासांच्या पावसातच शहरातील अनेक रस्ते आणि सुमारे ७५ सखल भाग जलमय झाले. मिरा रोडमधील यापूर्वी पाणी न साचणाऱ्या परिसरांमध्येही यंदा पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले.

MIRA BHAYNDAR : मिरा-भाईंदरमध्ये पावसाचा कहर; आपत्ती व्यवस्थापन विभागावर प्रश्नचिन्ह

प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप नगरसेवक विजय पाटील, सचिन डोंगरे आणि करुणा पाटील यांनी नालेसफाईतील हलगर्जीपणाचा आरोप करत साचलेल्या पाण्यातच आंदोलन केले. संबंधित अधिकारी आणि नालेसफाईच्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

या आंदोलनामुळे मात्र एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेत सत्ता भाजपची, लोकप्रतिनिधी भाजपचे आणि आंदोलनही भाजपच्या नगरसेवकांचेच. मग प्रशासनावर नियंत्रण नेमके कोणाचे? जर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर शहरातील कारभार कोणाच्या देखरेखीखाली सुरू आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ झाल्याचे दावे केले जातात. मात्र पहिल्याच जोरदार पावसात शहर जलमय होत असल्याने या खर्चाचे नेमके काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नालेसफाईची कामे कागदोपत्री झाली की प्रत्यक्षात, याची चौकशी करण्याची मागणीही जोर धरत आहे.

याशिवाय शहरातील सखल भागांमध्ये बसविण्यात आलेले लाखो रुपयांचे पाणी उपसणारे पंपही अनेक ठिकाणी बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे पाणी तासन्तास साचून राहिले. आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दिसून न आल्याने नागरिकांनी समाजमाध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

शहरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यंदाही परिस्थितीत कोणताही बदल दिसून न आल्याने महापालिकेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रशासन दोषींवर कारवाई करून जबाबदारी निश्चित करणार की पुन्हा एकदा चौकशीच्या घोषणांपुरतेच प्रकरण मर्यादित राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Mira Bhayandar News : नारळाचे झाड अंगावर कोसळून राहुल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; मुर्धा गावावर शोककळा

Web Title: Mira bhayandar waterlogging bjp corporators protest drain cleaning heavy rain mbmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • mira bhayandar
  • Rain Update

संबंधित बातम्या

देवदूतासारखा धावला आरपीएफ जवान! पुणे रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली जाणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण
1

देवदूतासारखा धावला आरपीएफ जवान! पुणे रेल्वे स्थानकावर ट्रेनखाली जाणाऱ्या महिला प्रवाशाचे वाचवले प्राण

संततधार पावसाने बळीराजाला दिलासा; उत्तर पुणे जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीला वेग
2

संततधार पावसाने बळीराजाला दिलासा; उत्तर पुणे जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीला वेग

MIRA BHAYNDAR : मिरा-भाईंदरमध्ये पावसाचा कहर; आपत्ती व्यवस्थापन विभागावर प्रश्नचिन्ह
3

MIRA BHAYNDAR : मिरा-भाईंदरमध्ये पावसाचा कहर; आपत्ती व्यवस्थापन विभागावर प्रश्नचिन्ह

Weather Update : ‘६ जुलैपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस अन् वादळी…’, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन
4

Weather Update : ‘६ जुलैपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस अन् वादळी…’, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.