Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या खासदारानंतर आता आमदारही फुटणार? आमदाराने नेमकं काय म्हटलं…

अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या सहा खासदारांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 20, 2026 | 03:24 PM
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन...

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आता आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन...

Follow Us
Follow Us:

हिंगोली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार बंड करून शिंदेसेनेत दाखल होणार आहेत. या घटनेनंतर काही तासांत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे तब्बल १४ ते १५ आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या संदर्भात ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते.

अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या सहा खासदारांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे. आष्टीकर यांच्या प्रवेशानंतर हिंगोलीसह मराठवाड्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे, असेही आमदार बांगर यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर बोलताना आमदार बांगर यांनी आपल्या पूर्वीच्या दाव्याची आठवण करून दिली.

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वीच खासदार नागेश पाटील आष्टीकर आमच्यासोबत येतील, असे मी सांगितले होते. आज तो दावा खरा ठरला आहे. त्यामुळे आता ‘आगे आगे देखो होता है क्या’ अशी परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.

शिवसेना अधिक सक्षम

पुढे बोलताना आमदार बांगर यांनी आणखी एक राजकीय गौप्यस्फोट केला. राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार असून, अनेक आमदार संपर्कात आहेत. योग्य वेळ आल्यावर सर्व काही समोर येईल, असे सांगत त्यांनी नव्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले. मात्र, संपर्कात असलेल्या आमदारांची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.

शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली

ठाकरे गटातील खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा बांगर यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोकप्रतिनिधी पक्षात येत आहेत. त्यामुळे शिवसेना अधिक सक्षमपणे पुढे जात आहे, असे ते म्हणाले.

आता हिंगोलीमधील विकासकामांना मिळेल गती

लोकसभा निवडणुकीनंतर हिंगोलीसह मराठवाड्यातील अनेक विकासकामे रखडल्याची चर्चा होती. मात्र, खासदार आष्टीकर यांच्या प्रवेशानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही बांगर यांनी व्यक्त केला. दरम्यान, संतोष बांगर यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले असून, ठाकरे गटातून आणखी काही आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

निकाल लागताच ओमराजे निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य, ‘पोलीस, सीआयडीवर प्रचंड दबाव..,’

Web Title: After the mp an mla from the thackeray faction is also set to exit says santosh bangar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Santosh Bangar
  • Shivsena Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
3

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
4

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.