Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bacchu Kadu Viral Video: मंत्रिपदासाठी भोंदूचा आशीर्वाद? गुवाहाटी रिटर्न बच्चू कडूंचा खरातसोबतचा व्हिडिओ Viral

हा व्हिडीओ दोन वर्षांपू्र्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे काही आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. पण त्यानंतरही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही,

  • By anuradha sagar
Updated On: Mar 24, 2026 | 02:49 PM
Bacchu Kadu Viral Video, Fraud Baba Ashok Kharat, Rupali Chakankar

Bacchu Kadu Viral Video, Fraud Baba Ashok Kharat, Rupali Chakankar

Follow Us
Follow Us:
  •  नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या पाया पडतानाचा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा व्हिडिओ
  • या व्हिडिओमध्ये अशोक खरात बच्चू कडूंना “तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा इथे या” असे म्हणताना दिसत
  • हा व्हिडिओ २०२२ मधील सत्तांतराच्या काळातील असल्याचे सांगितले जात आहे
Bacchu Kadu Ashok Kharat Viral VIDEO: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याचदरम्यान, राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांशी खरातचे कनेक्शनही असल्याचे दिसून आले. याबबात आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडून यांचाही खरातसोबतचा पाया पडतानाचा व्हिडीओ समोर आली आहे. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

दापोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश; योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ‘धनुष्यबाण’ हाती

बच्चू कडूंचा कॅप्टन खरातसोबतचा व्हिडिओ व्हायरल

कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असतानाच आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचाही अशोक खरात यांच्यासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॅप्टन अशोक खरात बच्चू कडूंशी बोलताना दिसत आहे. खरात कडू यांनामंत्रिपद मिळणार असल्याचे सांगतो. “I would like to say, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची आहे, जेव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या,” असं खरात कडू यांना म्हणताना दिसत आहे. खरातच्या या बोलण्यानतंर कडू त्याच्या पाया पडतात.

हा व्हिडीओ दोन वर्षांपू्र्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे काही आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. पण त्यानंतरही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही, २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटीला गेले त्यावेळी बच्चू कडू हेदेखील त्यांच्यासोबत गेले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे सरकारमध्ये बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळाले नाही. त्यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Satara ZP Conflict : सातारा प्रकरण टाकणार महायुतीत मिठाचा खडा? मध्यरात्री DCM शिंदेंनी गाठले वर्षा निवासस्थान

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी यावर अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “समाजात भोंदू बाबांच्या वाढत्या जमातीला नेते आणि सामान्य जनता दोन्ही तितकेच जबाबदार आहेत. आपल्याकडे एवढे खुळे नेते आहेत की, ते अशा भोंदूबाबांच्या चरणी जाऊन पाय पसरतात आणि त्यांचे पाय धुतात. जे स्वतःच्या वडिलांचे पाय कधी धुत नसतील, ते या भोंदूंचे पाय धुताना दिसतात, हे अत्यंत दुर्दैवी आणि कठीण आहे.”

फोटोवरून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर

अशोक खरातचे अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर कडू यांनी नेत्यांची पाठराखणही केली. “राजकीय नेत्यांसोबत सार्वजनिक जीवनात कोणीही येऊन फोटो काढू शकतो. फक्त फोटो काढला म्हणून त्या नेत्याला या गुन्ह्यांसाठी जबाबदार कसे धरायचे?” असा उलट सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पाहा व्हिडीओ-

 

Web Title: After rupali chakankar bacchu kadus video with godman ashok kharat goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • rupali chakankar
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.