Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar News: ‘देशातील परिस्थिती गंभीर…’; शरद पवारांची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी

Sharad pawar News- राहुल गांधी हे संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते हे संवैधानिक पद आहे. अशा पदावरील व्यक्तीबाबत अयोग्य भाषा वापरणे चुकीचे आहे

  • By anuradha sagar
Updated On: May 14, 2026 | 05:28 PM
Sharad Pawar, Baramati Politics, Inflation,

Sharad Pawar, Baramati Politics, Inflation,

Follow Us
Follow Us:
  • इराण-अमेरिका युद्धामुळे उद्भवलेल्या जागतिक ऊर्जा संकटाच्या तोंडावर
  • केंद्र सरकारने आवाहन न करता तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्व नेत्यांना विश्वासात घ्यावे, शरद पवार
  • आगामी सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानांनी स्वतः उपस्थित राहावे, – शरद पवार
Sharad Pawar: इराण-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगात उर्जासंकटाचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीचे आवाहन केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पंतप्रधानांच्या ताफ्यातील गाड्याही कमी होणार असल्याची चर्चा आहे. राज्यातही मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर नेत्यांनीदेखील त्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्याच निर्णय घेतला आहे. अनेकांनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत. त्यामुळे देशातील सर्वांनीच पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे देशभरातील भाजप नेत्यांकडून आवाहन केले जात आहे.

या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांनी मोठी मागणी केली आहे. ” केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी आणि सर्वांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी पवार यांनी यांनी केली.

NEET पेपरफुटीवरून Raj Thackeray भडकले,”सरकारची लोकांना वेठीस धरण्याची परंपरा, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!”

आज (14 मे) सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील आणीबाणीवर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले की, “ सध्या देशातील परिस्थिती गंभीर आहे. अशा वेळी देशातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावावी आणि त्या बैठकीला पंतप्रधानांनी स्वतः उपस्थित राहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांत सर्वपक्षीय बैठका झाल्या, मात्र त्यात पंतप्रधान उपस्थित नव्हते. पण आताची परिस्थिती गंभीर असल्याचे बोललं जात आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी मिळून निर्णय घेतले पाहिजेत.”

“१७ गाड्यांवरून ८ गाड्या केल्याचे ऐकून धक्का बसला”

सरकारकडून इंधन बचतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर भाष्य करताना शरद पवार यांनी काही मंत्र्यांच्या भूमिकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “आज सकाळपासून टीव्हीवर पाहतोय, कोणी मोटारसायकलवरून जात आहे, कोणी पायी चालत आहे. एका मंत्र्यांनी सांगितले की, त्यांच्या ताफ्यात आधी १७ गाड्या होत्या आणि आता त्या ८ वर आणल्या. हे ऐकून मला धक्काच बसला. म्हणजे आधी १७ गाड्या होत्या, हेच आश्चर्यकारक आहे. परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन गंभीर असायला हवा.” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला

“राहुल गांधींबाबत वापरलेली भाषा अयोग्य”

मुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांनी वापरलेल्या भाषेबाबतही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. “राहुल गांधी हे संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेते हे संवैधानिक पद आहे. अशा पदावरील व्यक्तीबाबत अयोग्य भाषा वापरणे चुकीचे आहे,” असही त्यांनी नमुद केलं.

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

“निवडणुकांनंतरच गंभीरतेची जाणीव का?”

देशातील आर्थिक परिस्थिती, रुपयाची घसरण आणि युद्धजन्य वातावरणावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “रुपया खाली का येतो, याचाही विचार झाला पाहिजे. इराणसारख्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होतोच. पण निवडणुका संपल्यानंतर अचानक सरकारला परिस्थितीचे गांभीर्य जाणवू लागले. निवडणुकांच्या काळात जनतेला याची जाणीव करून देण्यात आली नाही.”

“सोनं खरेदी करू नका, हा सल्ला चुकीचा नाही”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोने खरेदी टाळण्याचे केलेले आवाहन चुकीचे नाही. सोनं खरेदी करू नका, याचा अर्थ रुपयाची किंमत घसरू नये, हा आहे. हा सल्ला चुकीचा नाही. मात्र, एका बाजूला काटकसरीचे आवाहन करायचे आणि दुसऱ्या बाजूला वेगळेच चित्र दिसत असेल, तर प्रश्न उपस्थित होतात,” असे ते म्हणाले.

Web Title: Sharad pawar press conference may 14 on global energy crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Petrol price hike
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
1

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
2

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक
3

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
4

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.