Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: वाहनांवरील खर्च कमी करण्यासाठी कारपुलिंगचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत

  • By anuradha sagar
Updated On: May 14, 2026 | 03:12 PM
Devendra Fadnavis, Maharashtra Politics,Fuel Saving,

Devendra Fadnavis, Maharashtra Politics,Fuel Saving,

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ मे रोजी उच्चस्तरीय बैठक घेऊन सरकारी खर्चात कपात आणि कडक आर्थिक शिस्त लागू करण्याचे निर्देश
  • अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त शासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवर बंदी घालण्यात आली असून, प्रशासकीय खर्च वाचवण्यासाठी शक्य तितक्या बैठका ऑनलाईन घेण्याचे आदेश
  • इंधन बचतीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा (मेट्रो, बस, लोकल) वापर करण्याचा सल्ला दिला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन समाजात सकारात्मक संदेश द्यावा, असे सूचित केले आहे.
 

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सर्व राज्य सरकारांनांकडून त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक आर्थिक शिस्त लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी १३ मे रोजी उच्चस्तरीय बैठकीत सरकारी खर्चाला कात्री लावण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारमधील अनेक विभागांमध्ये खर्चात बचत आणि काटकसर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परदेश दौरे, वाहन वापर, बैठका, खाद्यपदार्थांचा खर्च आणि सार्वजनिक कार्यक्रमांवरील खर्च कमी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

1. परदेश दौऱ्यांवर निर्बंध
राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि विभागांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध घालणअयाचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक आणि राज्यहिताशी संबंधित असलेल्या दौऱ्यानांच परवानगी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच,मंत्री आणि अधिकाऱ्यांनी परदेश दौरे टाळून त्या माध्यमातून होणारा खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Devendra Fadnavis News: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

2. डिजिटल बैठका
सर्व शासकी विभागांना शक्य तितक्या बैठका ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यामातून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर वाढवून प्रवास, निवास आणि इतर प्रशासकीय खर्चात बचत करण्याावर सरकारचा भर असणार आहे.

3. सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषत: वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान एकदा मेट्रो, लोकल ट्रेन किंवा बसने प्रवास करावा, अशाही सुचना जारी करण्यात आल्या आहेत.यामुळे इंधन बचतीसोबतच सामान्य नागरिकांमध्येही सार्वजनिक वाहतुकीबाबतच सकारात्मक संदेश जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

4. कारपुलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन

वाहनांवरील खर्च कमी करण्यासाठी कारपुलिंगचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना देतानाच इंधनावरील खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान

5. शासकीय कँटीन आणि रुग्णालयांच्या मेन्यूमध्ये बदल

राज्य सरकारने शासकीय कँटीन, रुग्णालये आणि अंगणवाडी केंद्रांमधील मेन्यू कार्डमध्येही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी कमी तेलकट पदार्थांना प्राधान्य दिले जाणार आहे. आरोग्यदायी आहारासोबतच खर्च नियंत्रणाचा उद्देश या निर्णयामागे असल्याचे सांगितले जात आहे.

6. बाईक रॅली आणि वाहन मिरवणुकांवर निर्बंध

इंधन बचत आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेता वाहनांच्या मिरवणुका आणि बाईक रॅलींवरही निर्बंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा कार्यक्रमांना पोलिस विभागाकडून परवानगी नाकारली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमधील मोठ्या वाहन रॅलींमुळे होणारा इंधन खर्च आणि वाहतूक कोंडी टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

7. काटकसरीच्या धोरणावर सरकारचा भर

राज्य सरकारने प्रशासनात काटकसर आणि संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. वाढते इंधन दर, आर्थिक ताण आणि सरकारी खर्च कमी करण्याच्या उद्देशाने या उपाययोजना राबवल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. आगामी काळात आणखी काही बचत उपाययोजनांची घोषणा होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Maharashtra politics devendra fadnavis cost cutting decisions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Government
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
1

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
2

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
3

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब
4

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.