ajit pawar statement on ncp sharad pawar political news
बारामती : मागील तीन वर्षामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घ़डामोडी घडल्या आहेत. यामुळे नवीन राजकीय समीकरणे होताना दिसत आहे. विधानसभा निव़डणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी यश मिळाले आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळामध्ये अजित पवार हे त्यांच्या स्पष्टोक्ती बोलण्यामुळे चर्चेत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील रस्त्यांच्या कामावेळी काकांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, “काका कुतवळ यांना मी या रस्त्याबाबत सांगितलं आहे. त्यांना मी म्हणालो आहे की सहकार्य करा. याशिवाय मी तहसीलदार, बीडीओ आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांना – देखील आदेश दिले आहेत. मी त्यांना म्हटले, काकालाही विश्वासात घ्या. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे काही चालत नाही. काका लोक म्हणजे काका कुतवळ यांना… नाहीतर ही माध्यमं लगेच चर्चा करतील, अजितदादा घसरले. कोणावर घसरले यावर चर्चा होईल.” असे मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी केले. यानंतर आसपास एकच हशा पिकला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रायगडावर बोलण्यासाठी संधी दिली नाही असा आरोप करण्यात आला. याबाबत ते म्हणाले की, त्यावेळी 2 वाजून गेले होते. कार्यक्रमाला उशीर झाला होता. त्यांनी बोलण्यासाठी विनंती केली होती. मात्र मीच सांगितलं की आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील. देवेंद्र फडणवीस हे आमच्या सर्वांच्या वतीने बोलले. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहे. त्यांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मागील आठवड्यामध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचा उल्लेख दैवत म्हणून केला होता. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते. अजित पवार हे बीड दौऱ्यावर होते. यावेळी ते म्हणाले की, “बोलताना भान बाळगा, पुढाऱ्यांच्या पाया पडायचं असेल तर त्याचा इतिहास आठवा. तसेच माझ्या पाया पडायला येऊ नका, हार, टोप्या, मानचिन्ह काही देऊ नका, चुलत्याच्या कृपेने आमचं बरें चालले आहे.” असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या चिरंजीवाचा साखरपुडा देखील पार पडला आहे 10 एप्रिल रोजी जय पवार आणि फलटण येथील उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा संपन्न झाला. पुण्यातील घोटावडे येथे स्थित फार्महाऊसवर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता . या खासगी आणि पारंपरिक पद्धतीने झालेल्या सोहळ्याला पवार कुटुंबातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. अजित पवार हे स्वतः शरद पवार यांना घेण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ गेले होते. या सोहळ्यामध्ये पवार कुटुंबियांची एकी दिसून आली होती.