Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, मंत्रिमंडळ विस्तार, नर्मदा प्रकल्प तसेच शिंदे गटाच्या खासदारांच्या भवितव्यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 08, 2026 | 03:07 PM
अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?

Follow Us
Follow Us:
  • अमित शाह – देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा
  • अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे तीन तास स्वतंत्र बैठक
  • राज्यातील राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदे गटाच्या खासदारांबाबत महत्त्वाचे मुद्दे चर्चेत
 

राज्यातील राजकीय वातावरणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आधी शिवसेना ठाकरे गटातून खासदार फुटल्यानंतर आता महाविकास आघाडीमधूनही आमदार आणि खासदार फुटणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (मंगळवार, 7 जुलै) गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड बैठक पार पडली. नर्मदा प्रकल्पाच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा झाली असून राज्यातील राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदे गटाच्या खासदारांबाबत महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नर्मदा प्रकल्पानंतर अमित शाह-फडणवीस यांची स्वतंत्र बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नर्मदा प्रकल्पासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राला नर्मदा नदीचे पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे तीन तास स्वतंत्र बैठक झाल्याचे सांगितले जात आहे.

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान

मंत्रिमंडळ विस्तार आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा

सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा झाली. मात्र, राज्य मंत्रिमंडळात तातडीने कोणतेही बदल होणार नसल्याचेही सांगितले जात आहे.

शिंदे गटाच्या खासदारांना केंद्रात मंत्रीपदाची संधी?

अलीकडेच ठाकरे गटातून बंड करून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी दोघांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. या विषयावरही अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात. या विस्तारात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून काही विद्यमान मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील काही नेत्यांचीदेखील केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Politics: सस्पेन्स संपला! शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं

गेल्या काही दिवसांत ठाकरे गटातील बंडखोरी, शिंदे गटाची वाढती ताकद आणि संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Amit shah devendra fadnavis delhi meeting cabinet expansion maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • CM Devendra Fadnavis
  • shivsena

संबंधित बातम्या

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
1

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’
2

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
3

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने
4

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.