Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अजिदादांवर बोलणारा नेता कितीही मोठा असला तरी…” रोहित पवारांनी केलेल्या ‘ऑडिओ क्लिप’च्या दाव्यावरून अमोल मिटकरींचा थेट इशारा

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरु असल्याचे दिसत आहे. पक्षातील एकूण नाराजीनाट्य संपण्याची अजूनतरी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

  • By विवेक
Updated On: May 18, 2026 | 02:37 PM
“अजिदादांवर बोलणारा नेता कितीही मोठा असला तरी…” रोहित पवारांनी केलेल्या ‘ऑडिओ क्लिप’च्या दाव्यावरून अमोल मिटकरींचा थेट इशारा
Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत बोलतानाची ऑडिओ क्लिप बाहेर, रोहित पवार यांचा दावा
  • ऑडिओ क्लिपवरून अमोल मिटकरी आक्रमक
  • रोहित पवार यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरु असल्याचे दिसत आहे. पक्षातील एकूण नाराजीनाट्य संपण्याची अजूनतरी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातील घडामोडी या झपाट्याने बदलत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षातील पदावरून पक्षात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार पटेल आणि तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक खळबळजनक दावा केला होता. “राष्ट्रवादीतील दोन बडे नेते अजित पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत बोलतानाची ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे,” असा दावा त्यांनी केला होता. ते बदल नेते कोण याचा खुलासा अजून केला नसला तरीही राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून भाष्य करत, “अजितदादांविषयी खालच्या भाषेत बोलणारा नेता कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही, त्याला व्याजासहित उत्तर देऊ,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ

रोहित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना हा खळबळजनक दावा केला होता. यावेळी ते म्हणाले, “राष्ट्रवादीतील दोन बडे नेते अजित पवार यांच्याविषयी अत्यंत खालच्या भाषेत बोलतानाची ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. हि क्लिप सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना ऐकवण्यात आली आहे. ते दोन नेते अजित पवारांविषयी काय बोलले हे सुनेत्रा वहिनींना माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्याच्या आधी राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने सुनेत्रा पवारांना हि ऑडिओ क्लिप ऐकवली होती,” असा दावा त्यांनी केला आहे.

Sanjay Raut PC: ‘अजित पवारांचा पक्ष मुळात कधी अस्तित्वातच नव्हता; संजय राऊतांचे महायुतीवर टीकास्त्र

ऑडिओ क्लिपवरून अमोल मिटकरी आक्रमक

रोहित पवार यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अमोल मिटकरी यांनी सुरुवातीला हा दावा फेटाळण्याचा प्रयत्न करत “सध्या विविध चर्चांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. या ऑडिओ क्लिपच्या चर्चेत कोणतेही तथ्य असेल असे वाटत नाही,” असे भाष्य केले. परंतु पुढे बोलताना ते म्हणाले, “ऑडिओ क्लिपची चर्चा खरी असली तर अजितदादांवर खालच्या भाषेत बोलणारा नेता कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही, त्याला व्याजासहित उत्तर देऊ,” असा थेट इशारा त्यांना यावेळी दिला.

“महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारने एवढं केलं नसेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून फडणवीसांचे खडेबोल

Web Title: Amol mitkari warns over alleged audio clip statement by rohit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • amol mitkari
  • rohit pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
1

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या;  रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
2

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

‘उद्योगांबाबत फक्त दावे नको, आकडे जाहीर करा’; रोहित पवारांचा सरकारला सवाल
3

‘उद्योगांबाबत फक्त दावे नको, आकडे जाहीर करा’; रोहित पवारांचा सरकारला सवाल

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’
4

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.