Sanjay Raut PC: 'अजित पवारांचा पक्ष मुळात कधी अस्तित्वातच नव्हता; संजय राऊतांचे महायुतीवर टीकास्त्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद सातत्याने चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. महापालिकांच्या निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. पण अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चांना पूर्णविराम लागला. पण आता पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या आहेत.या चर्चा सुरू असतानाच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे पक्षांतर्गत वादही समोर येऊ लागले आहेत. याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर सडकून टिका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “अजित पवारांचा राष्ट्रवादी किंवा शिंदेंची शिवसेना हे मुळातच पक्ष नाहीत. अजित पवार हयात असतानाही हा कधीही पक्ष नव्हता. निवडणूक आयोगाच्या माध्यमाने या हे गट तयार झाले आहेत. पण राष्ट्रवादी हा मूळ पक्ष शरद पवार यांचा आणि शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे. आता त्यावर ३० जुलैला सुनावणी आहे. बाकी अजित पवार वगैरे पक्ष नाहीत. ते वेगळ गट होते. दबावाखाली लोक फूटले आणि बाजूला गेले.
पक्षांना काही विचारधारा आणि भूमिका असतात पण या दोन पक्षाकडे त्या आहेत का, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला. तसेच, शिंदेची विचारधारा बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवारांच्या पक्षाची विचारधारा शरद पवारांच्या पक्षासारखी आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.
संजय राऊत यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तचकरे यांच्यावर टीका केली. पार्थ पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची चर्चा सुरू असताना राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले, “मला त्याबाबत माहिती नाही. पण ही त्यांच्या कर्माची फळं आहेत,” असे राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले, “अजित पवार यांचं डोकं फिरवण्यात जे काही प्रमुख लोक होते, त्यामध्ये धनंजय मुंढ, प्रफुल्ल पटेल यांसारख्या नेत्यांचा समावेश होता. आज त्यांनाच त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.”
राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आणि इंधन बचतीच्या आवाहनावरही राऊत यांनी टीका केली. “भारतीय जनता पार्टीला सुखाची आणि अय्याशीची चटक लागली आहे. ढोंग करण्याची सवय त्यांना झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला. “भाजपने या ढोंगी प्रवृत्तीतून बाहेर पडले पाहिजे. राष्ट्र संकटात आहे, हे निवडणुका संपल्यानंतरच कळाले का? महागाई वाढणार आहे, हे निकालानंतर समजले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक नाड्या भाजपाच्या हातात आहेत. त्यामुळेच जनता गरीब होत चालली आहे. ही चिंता पंतप्रधानांनी नेदरलँडमधून व्यक्त केली. त्यांनी इथे येऊन देशातील परिस्थितीकडे पाहावे. देशाची संस्कृती रसातळाला जात आहे, तर नेदरलँड पाहण्यासाठी त्यांचे राष्ट्र सक्षम आहे,” असा टोला त्यांनी लगावला.






