काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा 'हे' आयुर्वेदिक लिपबाम
चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. पण वारंवार केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जातात. चेहऱ्याची काळजी घेताना महिला ओठांकडे कायमच दुर्लक्ष करतात. पण ओठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये काळवंडलेले ओठ पुन्हा एकदा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ब्रँडच्या केमिकलयुक्त लिप बामचा वापर करतात. पण सतत लिपबाम लावल्यामुळे ओठांच्या त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काळवंडलेले ओठ पुन्हा एकदा चमकदार करण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा लिपबाम म्हणून वापर करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
Holi 2026: रासायनिक रंगांपासून सावध! त्वचेवर रॅशेस, मुरुम आणि केसगळतीचा धोका
बीट त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. बीटचा मास्क ओठांवर लावल्यास डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा अतिशय चमकदार होईल. यासाठी वाटीमध्ये बीटचा रस घेऊन त्यात मध मिक्स करा. तयार केलेले मिश्रण ओठांवर हलक्या हाताने लावून काहीवेळ मसाज करा. मसाज केल्यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि ओठ चमकदार होतील. बीट ओठांना गुलाबी रंग देते आणि ओठ मुलायम करण्यास मदत करते. मधामध्ये असलेले गुणकारी घटक ओठांचा काळवंडलेला रंग सुधारतात.
थंडीत शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ओठ खूप जास्त सुकल्यासारखे वाटतात. ओठांची त्वचा खूप जास्त कडक होऊन जाते आणि ओठांचे आरोग्य बिघडते. यासाठी वाटीमध्ये चमचाभर खोबऱ्याचे तेल आणि साखर घेऊन मिक्स करा. तयार केलेले मिश्रण ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ओठांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल आणि ओठ चमकदार दिसतील. ओठांना एक्सफोलिएट, मऊ आणि स्मूथ करण्यासाठी खोबऱ्याचे तेल फायदेशीर ठरेल.
मागील बऱ्याच वर्षांपासून खोबरेल तेल आणि कोरफड जेलचा वापर त्वचेसाठी केला जात आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा हायड्रेट करण्यासाठी मदत करते. वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात कोरफड जेल मिक्स करा. तयार केलेले मिश्रण घट्टसर झाल्यानंतर ओठांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने ओठांवर मसाज करा. यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि ओठ गुलाबी होतील. फुटलेल्या ओठांमुळे होणारी जळजळ करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा.






