Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरण पेटलं! तृप्ती देसाई आणि चाकणकरांमध्ये ‘कोट्यवधींची डील’?; रूपाली ठोंबरेंचा थेट आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा आणि ‘तडजोडीचा’ खळबळजनक आरोप केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 22, 2026 | 01:42 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण बरंच तापलं
  • रुपाली पाटील-ठोंबरे यांचे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर खळबळजनक आरोप
  • प्रकरणातील पुर्वीपासूनच मात्र मोठी तडजोड केल्याचे आरोप
Ashok Kharat: तंत्र-मंत्र व अघोरी विद्येचा धाक दाखवून महिलांवर बलात्कार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण बरंच तापलं आहे. सध्या गाजत असलेलं हे प्रकरण आता नव्या वळणावर पोहोचले आहे. एकीकडे SIT कडून खरात आणि त्याच्या संबंधितांची कसून चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहे. व्हायरल होणारे व्हिडीओ आणि त्यामागची सत्य यामुळे हे प्रकरण आणखीनच तापत आहे. लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच खळबळ उडालेल्या या प्रकरणात आता राजकारण चांगलंच तापलं आहे. वेगवेगळ्या नेत्यांचे संबंध आणि त्यांच्यावरील प्रतिक्रियांमुळे हे प्रकरणं भडका घेत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा आणि ‘तडजोडीचा’ खळबळजनक आरोप केला आहे. या गंभीर आरोपामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Satara News : जिल्हा परिषदेत कमळ फुललं; सातारा झेडपीवर भाजपचा झेंडा फडकला

तृप्ती देसाईंची रुपाली चाकणकरांशी तडजोड

रूपाली पाटील यांच्या आरोपानुसार, कॅप्टन अशोक खरात प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ हे तृप्ती देसाई यांच्याकडे आधीपासूनच होते. मात्र, हे व्हिडिओ सार्वजनिक केले नाहीत. तर देसाई यांनी खरात यांच्या पत्नी आणि राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोडी केल्या असल्याचा दावा केला आहे. या तडजोडीमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे. हे सगळं प्रकरण तिथल्या तिथे संपवण्याचाही प्रयत्न केला गेल्याचीही शक्यता व्यक्त केली आहे.

तडजोड कशी केली?

तर रूपाली पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की, ज्या तृप्ती देसाई महिलांच्या हक्कासाठी लढण्याचा दावा करतात, त्यांनीच या प्रकरणात तडजोड कशी केली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, SIT कडून तृप्ती देसाई यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सुरू झालेले हे प्रकरण आता थेट राजकीय वळण घेत आहे. यात आता दोन महिला नेत्यांमधील थेट आरोप-प्रत्यारोपांनी वेढलं आहे. त्यामुळे आता सामाजिक आणि राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आता या आरोपावर तृप्ती देसाई काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गंभीर गुन्हा नोंदविण्यात आले आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खरातवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचे व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर समोर आली होती. बुधवार, 18 मार्च रोजी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या सगळ्यात पोलिसांनी कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली आहे. त्यात त्यांना एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. सुरुवातीला या पेन ड्राइव्हमध्ये 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पुढील तपासात ही संख्या वाढून सुमारे 100 व्हिडिओ असल्याची मोठी बातमी उघड झाली आहे. आता अशोक खरातच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे आल्या आहेत. त्यामुळे खरात विरोधात कारवाई करण्यासाठी एसआयटीला आणखी सबळ पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अखेर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा; पायउतार होताच केलं मोठं विधान, म्हणाल्या…

Web Title: Ashok kharat case multi crore deal between trupti desai and rupali chakankar rupali patil thombare claim nashik marathi crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • crime news
  • Nashik News
  • Rupali Patil
  • Rupali Thombare

संबंधित बातम्या

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
1

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
2

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
3

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
4

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.