सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सदस्य आणि साताऱ्याचे पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन चांगलीच ओढाताण झाली त्यामुळे शुक्रवारचा दिवस साताऱ्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक नाट्यमय घडामोडींचा ठरला भारतीय जनता पार्टीने अनेक राजकीय पर्यायांचा वापर करत अध्यक्ष पदावर आपली मोहर उमटवली आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे यांना उमेदवारी देऊन शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला मात्र साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती.
शाब्दिक चकमक आणि जोरदार धक्काबुक्की
शुक्रवारी निवड प्रक्रियेच्या दरम्यान राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व सदस्य लक्झररीतून जिल्हा परिषदेच्या सभागृहात येताना पोलीस बंदोबस्तामध्ये आणण्यात आले या सर्व राजकीय परिस्थितीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई व मदत व पुनर्वसन मंती मकरंद पाटील हे स्वतः जातीने लक्ष ठेवून होते. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर कोणालाही सोडण्यात येत नव्हते जि प सदस्य मान्यवर नेतेमंडळी यांना वगळता पोलिसांनी कोणालाही आत येऊ दिले नाही. सदस्यांना आत आणताना त्यांच्या ओळख परळीवरून सदस्य आणि शाहूपुरी पोलीस यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक आणि जोरदार धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.
दोन जिल्हा परिषद सदस्यांचे अपहरण झाल्याची तक्रार
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी भाजपला सहा मतांची गरज होती दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी एकत्रित राहणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीचे पारडे जड होते त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष साताऱ्याकडे लागून राहिले होते.साताऱ्यात गुरुवारी 19 मार्च रोजी रात्रभर आणि घडामोडी घडल्या त्यात राष्ट्रवादीच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली होती त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आम्ही स्वतः पक्ष सोबत गेल्याचे लेखी दिले आहे असे राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनी सांगितले.
शेवटच्या क्षणी ‘गेम चेंजर’ ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा
मात्र मतदानाच्या काही तास आधीच राजकीय घडामोडींना वेग आला. जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या सक्रिय हालचालीमुळे विरोधी आघाडीतील काही सदस्य फुटल्याची चर्चा रंगली. या अनपेक्षित घडामोडीमुळे सभागृहातील बहुमताचे समीकरण पूर्णपणे बदलले, त्यामुळे भाजपला विजय मिळवता आला.या विजयामागे ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विरोधी पक्षातील काही सदस्यांनी ऐनवेळी बाजू बदलल्याने भाजपला आवश्यक संख्याबळ मिळाले आणि त्यानी दोन्ही पदांवर विजय मिळवला. दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये खडा जंगी पालकमंत्र्यांचा रक्तदाब वाढला.
दोन सदस्य मतदान प्रक्रियेत अनुपस्थित
राष्टवादीचे जि प. सदस्य अनिल देसाई, संतोष मांडवे या दोन्ही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्यांच्यावर रात्री गुन्हा दाखल केला होता निवडीसाठी आले असता जिल्हा परिषद मधून त्यांना ताब्यात घेतले, त्यामुळे राष्ट्रवादीचे हे दोन सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत.






