Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati by election : सुनेत्रा पवारांविरोधात लढणार की माघार घेणार? काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंचे मत काय?

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटचा दिवस असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 09, 2026 | 11:37 AM
Baramati by election : सुनेत्रा पवारांविरोधात लढणार की माघार घेणार? काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंचे मत काय?
Follow Us
Follow Us:
  • बारामती पोटनिवडणूक बिनविरोध की चुरशीची
  • सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आकाश मोरे मैदानात
  • काँग्रेस बारामतीची उमेदवारी मागे घेणार का?
Baramati by election : बारामती : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक होत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांनंतर बारामतीचा नवीन दादा कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याची धुरा हाती घेतली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 53 अर्ज हे वैध ठरले आहेत. यामध्ये काँग्रेस उमेदवार आकाश मोरे, धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांचा देखील समावेश आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा महायुतीकडून व्यक्त केली जात होती. शरद पवार गटाने उमेदवार देण्यास नकार दिल्याने काँग्रेसने अर्ज दाखल केला आहे. सुनेत्रा पवार यांनी स्वतः फोन केल्यानंतर देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार दिला. यामुळे पार्थ पवार यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली.

हे देखील वाचा : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

दरम्यान, बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी घेतल्याचे मानले जात आहे. त्यामुळे सपकाळ याविषयीची चर्चा करण्याची शक्यता आहे. तर थोड्यावेळापूर्वी माध्यमांशी बोलताना बारामतीसाठी पक्ष जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका अद्यापही तळ्यातमळ्यात असल्याचे दिसते. पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असून दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.

पाच तासानंतर चित्र स्पष्ट होणार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांनी देखील काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे बारामतीच्या रिंगणात सुनेत्रा पवार बिनविरोध निवडणूक लढणार की काँग्रेस त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार आकाश मोरे यांनी पक्ष श्रेष्ठ कडून आलेले आदेश आल्यानंतरच पुढील भूमिका मांडणार आहे, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे अजून पाच तासानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

हे देखील वाचा :  Baramati by-electionची रणधुमाळी सुरु असताना सुनेत्रा पवार वर्षा बंगल्यावर; फडणवीसांनी दिला शब्द

Web Title: Baramati by election sunetra pawar unopposed election congress party withdraw akash more candidature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati by-election
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला
1

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन
2

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…
3

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
4

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.