Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati by election : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद

बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार असून यासाठी सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहे. यासाठी रोहित पवारांनी भावनिक पोस्ट केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2026 | 11:27 AM
Baramati Bypoll election Rohit Pawar Emotional Post on Sunetra Pawar Files Nomination

Baramati Bypoll election Rohit Pawar Emotional Post on Sunetra Pawar Files Nomination

Follow Us
Follow Us:
  • बारामतीमध्ये पोटनिवडणूकीची तयारी
  • सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीसाठी दाखल करणार अर्ज
  • रोहित पवार यांची सुनेत्रा पवारांसाठी भावनिक पोस्ट
Baramati By election : बारामती : दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. बारामतीमध्ये बिनविरोध निवडणूक करण्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर ही निवडणूक बिनविरोधी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर करत बारामतीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या काकी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी (Sunetra Pawar) भावनिक पोस्ट लिहिली आहे.

 

पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह देवदर्शन घेतले. गणरायाच्या दर्शनाने सुनेत्रा पवार यांनी नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. अजित पवारांनंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीला दुःखाची एक किनार आहे. यामुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करुन बारामतीकरांना भावनिक आवाहन केले आहे.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवार सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज; मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थित

काय आहे रोहित पवारांची पोस्ट?

आमदार रोहित पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीवर खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो! तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल..! असे भावनिक आवाहन रोहित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य… pic.twitter.com/wUXsMsQusF — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2026

हे देखील वाचा : शेवटच्या निर्णायक क्षणी सुनेत्रा पवारांचा राजकीय डाव; बारामतीसाठी सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस प्रदेशाध्यांना फोन

बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, तरीही काँग्रेसने रविवारी दिल्लीतून बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवाराचे नाव जाहीर केले. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Baramati bypoll election rohit pawar emotional post on sunetra pawar files nomination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Baramati by-election
  • rohit pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

SIR प्रक्रियेवर रोहित पवारांचा गंभीर आरोप; मतदारांचा हक्क धोक्यात असल्याचा दावा
1

SIR प्रक्रियेवर रोहित पवारांचा गंभीर आरोप; मतदारांचा हक्क धोक्यात असल्याचा दावा

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या;  रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
2

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

‘उद्योगांबाबत फक्त दावे नको, आकडे जाहीर करा’; रोहित पवारांचा सरकारला सवाल
3

‘उद्योगांबाबत फक्त दावे नको, आकडे जाहीर करा’; रोहित पवारांचा सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.