Shinde-BJP Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का
बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सत्तेत सहभागी होताना भाजपने शिंदे गटाला अडीच वर्षांनंतर सभापदीपद देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. असा दावा शिंदे सेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला. पण भाजपने दिलेला शब्द न पाळल्यामुळे आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे शिंदे गट, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संचालकांनी एकत्र येत भाजपच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला.
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 सदस्य संख्या आहे. पण निवडीवेळी भाजपचे 3 सदस्य अनुपस्थित राहिल्याने शिंदे गट, अजित पवार गट यांनी याच संधीचा फायदा घेत इतर अपक्ष आणि काँग्रेसच्या मदतीने सभापती पदाची निवडणूक घेतली. यात १५-० अशा मतांनी शिंदे गटाचे आशू वंजारी यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.
Pune Anti Encroachment: अतिक्रमाणात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे आणि छायाचित्रे सार्वजनिक करणा
राज्य पातळीवर भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाजार समित्यांच्या निवडणुका व सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांनी थेट काँग्रेसशी हातमिळवणी करत भाजपला शह दिला आहे. “शब्द पाळला नाही, म्हणून सत्ता बदलली,” असा संदेश यातून देण्यात आला असून, आगामी निवडणुकांच्या तोंडावर महायुतीसाठी हा मोठा इशारा मानला जात आहे.
भंडाऱ्यात आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक पार पडली. सत्तेत असलेल्या भाजपने अडीच वर्षांपूर्वी दिलेली लेखी आश्वासन न पाळल्याने महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट, आणि शिवसेना शिंदे गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी करत भाजपच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणला होता. आज या उठावाचा निकाल समोर आला असून, 18 सदस्य संख्या असलेल्या या बाजार समितीमध्ये भाजपचे 3 सदस्य अनुपस्थित राहिल्याने 15-0 अशा एकतर्फी मतांनी शिवसेनेच्या आशू वंजारी यांनी सभापती पदाची ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आता भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेची सत्ता आली असून, भाजपावर मात्र सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे.
Rahul Gandhi Chicago Speech: “मोदी सरकारमधील काही मंत्री आमच्या संपर्कात…; राहुल गांधींच्या
Ans: भाजपच्या सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर झालेल्या निवडीत शिवसेना (शिंदे गट) चे आशू वंजारी यांची १५-० मतांनी सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.
Ans: भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या दाव्यानुसार, सत्तेत सहभागी होताना भाजपने शिंदे गटाला अडीच वर्षांनंतर सभापतीपद देण्याचे लेखी आश्वासन दिले होते; मात्र भाजपने दिलेला शब्द न पाळल्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला.
Ans: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस आणि अपक्ष संचालकांनी एकत्र येत आशू वंजारी यांना सभापतीपदी निवडून दिले.






