Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले नेते, ते योग्य वेळी…’, सचिन अहिरांच्या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठे कौतुक

ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केलेले सचिन अहीर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहीर यांचे कौतुक केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 01, 2026 | 05:35 PM
सचिन अहिरांच्या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठे कौतुक (Photo Credit- X)

सचिन अहिरांच्या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठे कौतुक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘सचिन अहीर शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले नेते, योग्य वेळी…’
  • सचिन अहीरांच्या बिनविरोध निवडीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठे कौतुक!
  • वाचा संपूर्ण बातमी…
Devendra Fadnavis On Sachin Ahir: महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत मोठी घडामोड घडली आहे. ठाकरे गटाला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत सचिन अहिर यांना महायुतीकडून हे अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे पद मिळाले आहे.

ठाकरे गटाची ऐनवेळी माघार

१ जुलै रोजी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक पार पडणार होती. महायुतीकडून सचिन अहीर यांनी, तर ठाकरे गटाकडून जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या पदासाठी चुरस निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ऐनवेळी, ठाकरे गटाने ज. मो. अभ्यंकर यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी, सचिन अहिर यांची या पदावर बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

पाहा व्हिडिओ

Heartiest congratulations to MLC Sachin Ahir on being unanimously elected as the Deputy Chairman of the Legislative Council! विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी एकमताने निवड झाल्याबद्दल आमदार सचिन अहिर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! (विधानपरिषद, मुंबई | दि. 1 जुलै 2026)@AhirsachinAhir… pic.twitter.com/xKugqqSspU — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 1, 2026

Maharashtra Politics: सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा, ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, आदित्यंचं काय होणार?

ते योग्य वेळी थेट ‘गोल’ करतात’, मुख्यमंत्री फडणवीसांची टोलेबाजी

सचिन अहीर यांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत त्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘सचिन अहीर हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले राजकारणी आहेत. त्यामुळे योग्य वेळी थेट ‘गोल’ कसा करायचा आणि योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा, याची अचूक क्षमता त्यांच्यामध्ये आहे.’ पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला, ‘१९९९ मध्ये मी आणि सचिन अहिर पहिल्यांदा एकत्र आमदार म्हणून निवडून आलो होतो. ‘अहिर’ या शब्दाचा मूळ अर्थ गोपालक आणि निर्भीड असा होतो. मला त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून ते अत्यंत निर्भीडपणे आणि अभ्यासूपणे काम करणारे नेतृत्व आहे.’

सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा

सहा खासदारांचे बंड आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर, आता पक्षात आणखी एका मोठ्या फुटीबाबतच्या खळबळजनक बातम्या समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अहिर यांच्या पावलावर पाऊल टाकत विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनीही बंडखोर पवित्रा घेतला आहे. अशी चर्चा आहे की शिंदे हे एकटेच हे पाऊल उचलत नाहीत; त्यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील सुमारे ११ आमदार आणि अनेक माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याच्या तयारीत आहेत.

‘सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?’; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात

Web Title: Big win from chief minister fadnavis after sachin ahars unopposed election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Political
  • Sachin Ahir
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Juvenile Age Limit: बाल गुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Juvenile Age Limit: बाल गुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा, ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, आदित्यंचं काय होणार?
2

Maharashtra Politics: सचिन अहिर नंतर आता ‘हा’ आमदार फुटण्याची चर्चा, ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं, आदित्यंचं काय होणार?

Sanjay Raut News: ‘जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?’ सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर संजय राऊतांची जहरी टीका
3

Sanjay Raut News: ‘जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?’ सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर संजय राऊतांची जहरी टीका

Sachin Ahir : ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी
4

Sachin Ahir : ठाकरे गटातून शिंदे सेनेत, आता उपसभापतीपदाचीही लॉटरी; सचिन अहिर बिनविरोध विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.