Photo - X
राज्यात सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकर कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाच्या चेअरमन निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे ऊस दराच्या प्रश्नावरूनदेखील शेतकऱ्यांचा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. ऊस दराचा प्रश्न आता चांगलाच पेटल्याचं चित्र दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आज (५ नोव्हेंबर) तिसरा दिवस आहे. (Raju Shetti)
कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाका आणि साताऱ्यातील नागठाणे येथे हजारो शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला असून त्यामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा अक्षरशः खोळंबा झाला आहे.
सुरुवातीला उसाला प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. मात्र, साखर कारखानदार ३,८०० रुपयांच्या पुढे जायला तयार नसल्याने चर्चेची गाडी पुढे सरकत नव्हती.
शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि चर्चेतून मार्ग निघावा, यासाठी राजू शेट्टी यांनी आता एक पाऊल मागे घेत ४,२०० रुपये पहिली उचल देण्याची नवी मागणी जाहीर केली आहे. आता कारखानदारांनीही अडेलतट्टू भूमिका सोडून शेतकऱ्यांना योग्य दर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
किणी टोल नाक्यावरील सभेत राजू शेट्टी यांनी कारखानदारांना थेट इशारा दिला. ऊस शेतकऱ्यांच्या दारात उभा आहे, दिवाळी तोंडावर आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर साखर कारखान्यांच्या चेअरमन आणि संचालकांच्या घरासमोर शिमगा आंदोलन केलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनामुळे किणी टोल नाका आणि नागठाणे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. साताऱ्यातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. अवजड वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी रात्र महामार्गावरच जागून काढली. विशेष म्हणजे गावोगावच्या महिलांनी पुढाकार घेत आंदोलकांसाठी भाकरी, भाजी आणि जेवणाची व्यवस्था केली आहे.
आता राजू शेट्टी यांनी 4200 रुपयांचा प्रस्ताव दिल्यानंतर कारखानदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तोडगा निघणार की आंदोलन आणखी चिघळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.णार आहे.
Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात






