Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण रणनीती; निवडणुकीपर्यंत मतदारांना ठेवणार एकत्र

भाजपकडून या हालचालींबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी निवडणुकीपर्यंत पक्षाच्या मतदारांमध्ये समन्वय आणि एकजूट कायम ठेवण्यावर भर दिला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 16, 2026 | 08:32 AM
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण रणनीती; निवडणुकीपर्यंत मतदारांना ठेवणार एकत्र

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण रणनीती; निवडणुकीपर्यंत मतदारांना ठेवणार एकत्र

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रंगत वाढत असताना प्रमुख राजकीय पक्षांकडून मतदारांच्या संरक्षणासाठी आणि पक्षनिष्ठा कायम राखण्यासाठी विविध रणनीती आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने आपल्या समर्थक स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांना निवडणुकीपर्यंत एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्यातील शेंद्रे परिसरात भाजपच्या पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीतील गणिते, मतदानाची तयारी आणि पक्षाची भूमिका यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. बैठकीनंतर काही सदस्यांना पुढील काही दिवसांसाठी एका नियोजित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

Aaditya Thackeray : आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये क्रॉस व्होटिंग आणि मतफुटीच्या शक्यता लक्षात घेऊन विविध पक्षांकडून अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. यंदाही निवडणुकीतील प्रत्येक मताचे महत्त्व वाढल्याने सर्वच पक्षांनी आपल्या मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवण्यावर भर दिला आहे.

सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील राजकीय समीकरणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट नसल्याने या मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. महायुतीतील काही स्थानिक पातळीवरील मतभेद, तसेच मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमधील नाराजी याबाबतही विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी कोणते राजकीय चित्र समोर येते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपकडून या हालचालींबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी निवडणुकीपर्यंत पक्षाच्या मतदारांमध्ये समन्वय आणि एकजूट कायम ठेवण्यावर भर दिला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, १८ जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी सर्वच पक्षांकडून राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या निवडणुकीत प्रत्येक मत निर्णायक ठरणार असल्याने पुढील काही दिवस सातारा आणि सांगलीच्या राजकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.

Maharashtra Politics : ‘…तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल’; शंभूराज देसाईंचं मोठं विधान

Web Title: Bjp to keep voters united until the legislative council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

‘मोदी सरकार दबाव आणि भीतीचं राजकारण करतंय’; नाना पटोलेंचे टीकास्त्र
1

‘मोदी सरकार दबाव आणि भीतीचं राजकारण करतंय’; नाना पटोलेंचे टीकास्त्र

Abhijit Dipke Jaipur assault: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण
2

Abhijit Dipke Jaipur assault: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण

भाजप-राष्ट्रवादीचे ‘तळ्यात मळ्यात; स्पष्ट बहुमत असूनही ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा मार्ग; महायुतीला क्रॉस व्होटिंगची धास्ती?
3

भाजप-राष्ट्रवादीचे ‘तळ्यात मळ्यात; स्पष्ट बहुमत असूनही ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा मार्ग; महायुतीला क्रॉस व्होटिंगची धास्ती?

Maharashtra Politics : रामदास आठवलेंनी थेट शरद पवारांनाच दिली ‘ही’ मोठी ऑफर; राजकीय चर्चांना उधाण
4

Maharashtra Politics : रामदास आठवलेंनी थेट शरद पवारांनाच दिली ‘ही’ मोठी ऑफर; राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.