Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप-राष्ट्रवादीचे ‘तळ्यात मळ्यात; स्पष्ट बहुमत असूनही ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा मार्ग; महायुतीला क्रॉस व्होटिंगची धास्ती?

स्पष्ट बहुमताचे संख्याबळ असतानाही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना ‘तळ्यात मळ्यात’ स्वरूप आल्याची चर्चा आहे. संभाव्य क्रॉस व्होटिंगची धास्ती आणि राजकीय समीकरणे बिघडू नयेत यासाठी महायुतीकडून ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा मार्ग स्वीकारला जात असल्याची चर्चा रंगली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 15, 2026 | 03:12 PM
भाजप-राष्ट्रवादीचे 'तळ्यात मळ्यात; स्पष्ट बहुमत असूनही 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा मार्ग; महायुतीला क्रॉस व्होटिंगची धास्ती ? (फोटो सौजन्य-X)

भाजप-राष्ट्रवादीचे 'तळ्यात मळ्यात; स्पष्ट बहुमत असूनही 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा मार्ग; महायुतीला क्रॉस व्होटिंगची धास्ती ? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:
  • भाजप-राष्ट्रवादीचे ‘तळ्यात मळ्यात’
  • स्पष्ट बहुमत असूनही महायुतीची रिसॉर्ट पॉलिटिक्सकडे वाटचाल?
  • बहुमत असूनही क्रॉस व्होटिंगची धास्ती
  • महायुतीच्या ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ची चर्चा रंगली
नाशिक: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीने आता कमालीची रंगत पकडली आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुतीने आपल्या नगरसेवकांवर कडक ‘वॉच’ ठेवण्याची मोहीम सुरू केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे तीन उमेदवार असले, तरी दोघांनी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या त्यांची नावे मतपत्रिकेवर कायम राहणार असल्याने महायुतीच्या गोटात अस्वस्थता वाढली असून, नगरसेवकांना सहलीवर पाठवून मतांची सुरक्षितता राखण्यासाठी ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरू झाले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक शनिवारीच सहलीसाठी रवाना झाले आहेत. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रविवारी बाहेर पडतील असा दावा केला जात असतानाही प्रत्यक्षात दोन्ही पक्षांचे नगरसेवक जागच्या जागीच राहिले. भाजपकडून आता सोमवारी दुपारी नगरसेवक रवाना होतील, असे सांगण्यात येत आहे, तर राष्ट्रवादीत अद्याप यावर निर्णयच झालेला नसल्याचे नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले.

Nashik Onion Farmers: नाफेडची कांदा खरेदी केवळ कागदावरच! मनमाड, नांदगावात खरेदी केंद्रच नसल्याने शेतकरी संतप्त

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या काही नगरपालिकेचे नगरसेवक सहलीसाठी निघाल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे महायुतीतील दोन्ही प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या ‘तळ्यात मळ्यात’ सुरू असल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व नगरसेवकांना प्रथम ठाण्यात एकत्र आणून त्यानंतर गुप्तस्थळी हलविण्याची तयारी आहे.

विधान परिषद निवडणुकीत अस्वस्थता वाढली

महायुतीकडे या निवडणुकीत कागदावर तरी स्पष्ट संख्याबळ आहे. यामध्येः एवढे भक्कम संख्याबळ पाठीशी असूनही नगरसेवकांना सहलीवर पाठविण्याची वेळ का आली, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदार संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक मत निर्णायक ठरते. गुप्त मतदान, पसंतीक्रमाची पद्धत आणि मतपत्रिकेवर कायम असलेली अन्य उमेदवाराची नावे यामुळे एखादे मत जरी चुकीच्या ठिकाणी गेले किवा ‘क्रॉस व्होटिंग’ झाले, तर गणिते बिघडू शकतात. हाच घोका टाळण्यासाठी महायुतीने सावध पवित्रा घेतला आहे.

लोकप्रतिनिधी सहलीवर; नागरिकांचे प्रश्न वाऱ्यावर !

विधान परिषद निवडणुकीच्या या रिसॉर्ट राजकारणामुळे नाशिकच्या सामान्य नागरिकांमधून मात्र तीव संताप व्यक्त होत आहे.
शहरात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज आणि वीजपुरवठा यांसारख्या अनेक नागरी समस्या गंभीर बनल्या आहेत. अशा वेळी नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींची गरज असताना लोकप्रतिनिधी मात्र सहलीचा आनंद घेत आहेत. लोकप्रतिनिधी सहलीवर आणि नागरिक प्रश्नांसह प्रतीक्षेत असेच चित्र सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे.

‘टोकण’ आणि खर्चाची जोरदार कुजबुज !

नगरसेवकांच्या या राजकीय सहलीबरोबरच त्यांना ‘टोकण’ मिळणार असल्याच्या चर्चानी नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला आहे. ही निवडणूक जवळपास एकतर्फी मानली जात असली, तरी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि मतदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी मीठा खर्च केला जात असल्याची कुजबुज सुरू आहे, मात्र याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

भाजपाचे नगरसेवक एकत्र येऊन मतदान प्रक्रिया व वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्याकरिता उद्या जाणार आहे. सर्व उमेदवारांनी जाहीर माधार घेतल्यामुळे निवडणूक औपचारिकता राहिली आहे. माधारीची मुदत संपल्यानंतर दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे त्यांचे नावे मतपत्रिकेवर रहाणार आहे. त्यामुळे मतदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार सर्व मतदारांना मार्गदर्शन करणार आहे. त्याकरिता सर्व नगरसेवक जातील, अशी प्रतिक्रिया नाशिक महानगर जिल्हा भाजप न सुनील केदार यांनी दिली.

भाजप – सुमारे 190 नगरसेवक
शिवसेना – 171 नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस – 107 नगरसेवक

Nashik Politics: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा कायम; गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे लक्ष

Web Title: Bjp ncp resort politics cross voting fear mahayuti majority

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
1

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
2

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
3

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
4

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.