Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Election 2026 : ‘बंटी पाटील बंटीच राहिले, साहेब झालेच नाहीत’, गोकुळच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली

Gokul Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'बंटी पाटील बंटीच राहिले, त्यांचा बंटी साहेब झालाच नाही,' असा टोला लगावत त्यांनी 2019 मधील सत्तास्थापनेपासून ते गोकुळच्या सत्तासंघर्षापर्यंत अनेक मुद्द्यांवर गंभीर आरोप केले.

  • By विवेक
Updated On: Nov 10, 2026 | 04:19 PM
Chandrakant Patil:

Chandrakant Patil:

Follow Us
Follow Us:
  • चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल!
  • सोनिया गांधींबाबत मोठा दावा
  • गोकुळवरून राजकारण तापलं!
 

Gokul Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्यानंतर कोल्हापूरचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीवरून भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘बंटी पाटील बंटीच राहिले, त्यांचा बंटी साहेब झालाच नाही,’ अशा शब्दांत त्यांनी सतेज पाटलांची खिल्ली उडवली. गोकुळचं अध्यक्षपद न मिळाल्यामुळे सतेज पाटील महायुतीच्या नेत्यांवर टीका करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिरगाव येथील गोकुळ चौकात महायुतीच्या वतीने आयोजित सभेत चंद्रकांत पाटील बोलत होते. गोकुळचा निकाल लागल्यानंतर गेल्या 15 दिवसांत सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आणि खोटं नरेटिव्ह पसरवलं, असा आरोप त्यांनी केला. खेळणं मिळालं नाही की लहान मूल जसं हातपाय आपटतं, तशीच अवस्था सतेज पाटील यांची झाली आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Gokul Chairman Election 2026 : अजितदादांच्या राईट हॅन्डची ‘गोकुळ’ मध्ये बाजी! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड

4900 विरुद्ध 5100 मतांचा दाखला

गोकुळ निवडणुकीत समविचारी आघाडीचे 13 संचालक निवडून आले, तर महायुतीचे 12 संचालक विजयी झाले. मात्र, मतांच्या आकडेवारीत महायुतीला 5100, तर समविचारी आघाडीला 4900 मतं मिळाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. मग लोकशाहीची पायमल्ली कुठे झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणीबाणीच्या काळातील काँग्रेसच्या भूमिकेचा दाखला देत त्यांनी सतेज पाटलांवर टीका केली.

‘सोनिया गांधींना धमकावलं होतं’, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

2019 मधील सत्तास्थापनेच्या राजकारणावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांबाबत गंभीर दावा केला. त्यावेळी सतेज पाटील यांनी शरद पवारांच्या मदतीने सोनिया गांधी यांच्यावर दबाव आणला होता. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं नाही, तर आम्ही वेगळा गट तयार करू, अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

‘गोकुळची सत्ता मलई खाण्यासाठी हवी’

सतेज पाटील यांना गोकुळची सत्ता स्वतःच्या फायद्यासाठी हवी होती, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आणि कुटुंबातील आर्थिक वर्चस्वासाठी गोकुळची सत्ता हवी असल्याची टीका त्यांनी केली. ‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत,’ असा इशाराही त्यांनी दिला.

गोकुळच्या निवडणुकीनंतर आता महायुती आणि समविचारी आघाडीतील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हं आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या या आक्रमक भाषणाला सतेज पाटील काय प्रत्युत्तर देतात, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Gokul Chairman Election 2026 : कोण आहेत राजेश पाटील? अजितदादांचे विश्वासू आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून मैदानात!

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर काय टीका केली?

    Ans: गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना 'बंटी पाटील बंटीच राहिले, त्यांचा बंटी साहेब झालाच नाही,' असा टोला लगावला. अध्यक्षपद न मिळाल्यामुळे ते महायुतीच्या नेत्यांवर टीका करत असल्याचंही ते म्हणाले.

  • Que: गोकुळच्या निवडणुकीत महायुती आणि समविचारी आघाडीला किती जागा मिळाल्या?

    Ans: गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला 25 पैकी 13 जागा, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या होत्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे राजेश पाटील विजयी झाले.

  • Que: 2019 च्या सत्तास्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी काय आरोप केला?

    Ans: 2019 मध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या वेळी सतेज पाटील यांनी सोनिया गांधी यांच्यावर दबाव आणला आणि वेगळा गट स्थापन करण्याची धमकी दिली होती, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. यासंदर्भात कॉल रेकॉर्डिंग असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Web Title: Chandrakant patil criticizes satej bunty patil gokul election 2026 vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Gokul
  • Gokul Milk
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Gokul Chairman Election 2026 : अजितदादांच्या राईट हॅन्डची ‘गोकुळ’ मध्ये बाजी! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड
1

Gokul Chairman Election 2026 : अजितदादांच्या राईट हॅन्डची ‘गोकुळ’ मध्ये बाजी! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड

Gokul Chairman Election 2026 : कोण आहेत राजेश पाटील? अजितदादांचे विश्वासू आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून मैदानात!
2

Gokul Chairman Election 2026 : कोण आहेत राजेश पाटील? अजितदादांचे विश्वासू आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून मैदानात!

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच! सतेज पाटलांची आघाडी की महायुतीचा डाव यशस्वी? कोण होणार अध्यक्ष?
3

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच! सतेज पाटलांची आघाडी की महायुतीचा डाव यशस्वी? कोण होणार अध्यक्ष?

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा
4

Gokul President Election 2026 : ‘येताना चालत येतील, जाताना खांद्यावरून जातील’; राजू शेट्टींचा शासननियुक्त संचालकांना इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.