Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छगन भुजबळ यांनी पुन्हा केलं मोठं विधान; ‘मराठा समाजाला वेगळं आरक्षण…’

आमचं आरक्षण संपलं असा ठाम विश्वास झाला. अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नारायण राणे झाले. सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी काम केले. पण आत्ता जे चाललं आहे ते तुम्ही पाहत आहात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 10, 2025 | 01:09 PM
मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी पुन्हा केलं मोठं विधान; म्हणाले...

मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी पुन्हा केलं मोठं विधान; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केले आहे. ‘सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे. समता परिषदेने हा मोर्चा आयोजित केला आहे. कुणाला भाषणाला संधी द्यायची. नियंत्रण राहील त्यासाठी आमच्या सभेत मराठा समाजाला टार्गेट करत नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्या हे आमचं म्हणणं आहे. इथं गर्दी केली तर कुणालाच फायदा होणार नाही’, असे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘EWS दिले तेव्हा महाराष्ट्रात मराठा समोर होताच तेव्हा आम्ही विरोध केला नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्या हे आमचं म्हणणं आहे. इथं गर्दी केली तर कुणालाच फायदा होणार नाही. खोटी सर्टिफिकेट घेतले जात आहे. सकाळी अर्ज केले की, संध्याकाळी सर्टिफिकेट मिळत आहे. खऱ्या कुणबी समाजाने विरोध केला आहे. सोकोल्ड नेता उगवला आहे. आमच्या विरोधात बोलला नसता तर आम्हीही बोललो नसतो. कधी मला, कधी मुख्यमंत्री आणि राहुल गांधींना बोलला. नेते आहेत ते, फडणवीस राज्य चालवत आहे. शिवीगाळ करतो, पत्नीला बोलतो. वाटेल ते बोलायला काय परवाना घेतला का?, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : Bihar Election 2025: ‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी ‘या’ दिवशी पहिली यादी येणार? वाचाच…

दरम्यान, हॉलंड, पोलंड आणि पुढे काय बोलला? यशवंतराव चव्हाण म्हणाले आहे, राज्य मराठ्यांचं नाही तर मराठीचे होणार आहे. आता हे सगळे विसरलेले दिसतात. मी काल टीव्हीवर पाहिले, विखे मंत्रिमंडळ का पक्षाचा निरोप घेऊन गेले. मला माहिती नाही. मात्र, जो जीआर निघाला, त्यानंतर काल आत्महत्या झाल्या. 14 ते 15 आत्महत्या झाल्या. आमचं आरक्षण संपलं असा ठाम विश्वास झाला. अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नारायण राणे झाले. सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी काम केले. पण आत्ता जे चाललं आहे ते तुम्ही पाहत आहात.

भटक्या समाजात भ्रम

भटक्या समाजात भ्रम निर्माण होतो आहे. पुढे काय होईल सांगण्याएवढा मोठा मी नाही. पण एक निश्चित सांगतो की, मागासवर्गीय समाज मोठा आहे. ओबीसी वर्ग मोठा आहे. कुठल्या एका जातीसाठी लढत नाही. वेगवेगळ्या समाजातील लोक आत्महत्या करत आहेत. विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा ओबीसीचा DNA सांगितले. आता त्यांना किती आवश्यकता आहे की नाही माहिती नाही, असेही भुबजळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Chhagan bhujbal again made a big statement regarding maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Maharashtra Political
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मतदारसंघातच तळ; दादा भुसेंसह गिरीश महाजनही राजकीय मैदानात…
1

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मतदारसंघातच तळ; दादा भुसेंसह गिरीश महाजनही राजकीय मैदानात…

BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? महाराष्ट्रातील ‘या’ नावाची जोरदार चर्चा सुरु
2

BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? महाराष्ट्रातील ‘या’ नावाची जोरदार चर्चा सुरु

पेठ वडगाव पालिकेच्या निवडणुकीत येणार रंगत; नगरसेवकपदासाठी 48 उमेदवार रिंगणात
3

पेठ वडगाव पालिकेच्या निवडणुकीत येणार रंगत; नगरसेवकपदासाठी 48 उमेदवार रिंगणात

Maharashtra Politics : उदय सामंत देणार एकनाथ शिंदेंना डच्चू? थेट होणार उपमुख्यमंत्री? महिला नेत्याच्या पत्राने खळबळ
4

Maharashtra Politics : उदय सामंत देणार एकनाथ शिंदेंना डच्चू? थेट होणार उपमुख्यमंत्री? महिला नेत्याच्या पत्राने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.