Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक; ओबीसी आरक्षणावर म्हणाले, ‘कोण म्हणतं आरक्षण संपलं?’

मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या तयारीदरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा फेटाळत त्यांनी जात जनगणनेच्या मुद्द्यावर सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

  • By विवेक
Updated On: Aug 23, 2026 | 08:07 PM
जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक

जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक

Follow Us
Follow Us:
  • ओबीसी आरक्षणावर भुजबळ ठाम
  • जरांगे यांची लढाई ओबीसींच्या विरोधात नाही, असे भुजबळ म्हणाले.
  • 2011 पासूनची जात जनगणनेची मागणी आता सरकारच्या पातळीवर पुढे जात असल्याचा दावा
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाची तयारी सुरू केली असताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेची बैठक घेतली. राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत संघटनेच्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. यानंतर भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण, जात जनगणना आणि जरांगे यांच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली.

गेल्या काही दिवसांपासून समता परिषदेची बैठक झालेली नव्हती. त्यामुळे आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. बैठकीनंतर बोलताना भुजबळ यांनी ‘ओबीसी आरक्षण संपले’ हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला. जात पडताळणी प्रक्रियेत काही चुका असल्यास त्याविरोधात लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जात जनगणना करण्याची मागणी आपण 2011 पासून करत असल्याचे सांगत सरकारने आता त्यासंदर्भात निर्णय घेतल्याचा दावा भुजबळ यांनी केला. महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विविध जातींची स्थिती आणि त्यांच्या नोंदींबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत भुजबळ यांनी तुलनेने सावध भूमिका घेतली. जरांगे यांची लढाई ओबीसींच्या विरोधात नसल्याचे सांगत या विषयावर सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गरज पडली तेव्हा आपण ओबीसी आणि माळी समाजाच्या प्रश्नांसाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यभर फिरलो, असे सांगत संघर्षापासून आपण कधीही मागे हटलेलो नाही, असा संदेशही त्यांनी दिला.

दरम्यान, राज्यातील हवामानातील बदलांवरही भुजबळ यांनी भाष्य केले. काही भागांत अतिवृष्टी तर काही ठिकाणी पावसाचा अभाव जाणवत असल्याचे सांगत त्यांनी यामागे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे मत व्यक्त केले.

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

याशिवाय अन्न आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर त्यांनी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले. अंगणवाडीतील भोजनव्यवस्था आणि स्वच्छतेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांची समता परिषद बैठक आणि त्यानंतरची वक्तव्ये यामुळे ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे.

Web Title: Chhagan bhujbal samata parishad meeting obc reservation manoj jarange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Manoj Jarang patil
  • Maratha Reservation
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
1

‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

Manoj Jarange: ‘कुणाच्याही दबावाला बळी पडू नका…,’ मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या तयारीत; २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
2

Manoj Jarange: ‘कुणाच्याही दबावाला बळी पडू नका…,’ मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या तयारीत; २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.