Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात आज होणार भेट; राजकीय चर्चांना उधाण

नितीन देशमुख यांनी शनिवारी सकाळीच शरद पवार यांची भेट घेतली. देशमुख यांनी विधिमंडळाच्या लॉबीतील मारहाणीची माहिती पवारांना दिल्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 27, 2025 | 07:53 AM
मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात आज भेट होणार; राजकीय चर्चांना उधाण

मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात आज भेट होणार; राजकीय चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची रविवारी भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विधिमंडळातील नितीन देशमुख मारहाण प्रकरण आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ यामुळे अधिवेशन गाजले होते. यावरून फडणवीस यांनी सभागृहात सर्वपक्षीय आमदारांना खडसावले होते. जनता आमदारांना शिव्या देत आहे, आमदार माजले आहेत, असे तिखट भाष्य त्यांनी केले होते. या प्रकारानंतर सत्ताधारी-विरोधकांमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

हेदेखील वाचा : FIR Filed Against Rohit Pawar: विधानसभेतील ‘ते’ प्रकरण अंगलट…; रोहित पवारांविरोधात FIR दाखल

दरम्यान, नितीन देशमुख यांनी शनिवारी सकाळीच शरद पवार यांची भेट घेतली. देशमुख यांनी विधिमंडळाच्या लॉबीतील मारहाणीची माहिती पवारांना दिल्याची शक्यता आहे. देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने हा प्रकार गाजला होता. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. मात्र, जामिनावर सुटका झाली आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल, याची उत्सुकता आहे.

देशमुख-पडळकर कार्यकर्त्यात बाचाबाची

नितीन देशमुख आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीने वादाला सुरुवात झाली. सुरूवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही क्षणातच टोकाला गेला आणि दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. विशेष म्हणजे, या दोघांमध्ये यापूर्वीही तणावाचे प्रसंग घडले होते. त्यामुळे ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. यामुळे राजकारणही चांगलेच तापले होते.

हेदेखील वाचा : ‘OBC साठी राहुल गांधी ठरणार दुसरे आंबेडकर’, काँग्रेस नेता उदित राजचे मोठे विधान, भाजपावर साधला निशाणा

Web Title: Chief minister devendra fadnavis and sharad pawar will meet today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 07:53 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • political news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
3

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Breaking News Updates Today:  राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा
4

Maharashtra Breaking News Updates Today: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.