आमदार रोहित पवार यांनी नेते संजय शिरसाट यांनी मुंबईमध्ये बिवलकर कुटुंबासाठी जमीन घोटाळा केला असल्याचा आरोप केला (फोटो - सोशल मीडिया)
FIR Filed Against Rohit Pawar: सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
रोहित पवार यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. रोहित पवार यांनी आपल्या सहकारी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांच्या अटकेबाबत आक्षेप घेतला होता. त्यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांशी वाद घातल्यामुळे वादाची ठिणगी पडली. रोहित पवार यांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांसोबत अरेरावी केल्याच्या आरोपातूनच रोहित पवारांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
भूकंपामुळे हादरली रशियाची जमीन; त्सुनामीचा इशाऱ्याने लोकांमध्ये घबराट, जाणून घ्या काय आहे परिस्थिती?
नितीन देशमुख आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीने वादाला सुरुवात झाली. सुरूवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही क्षणातच टोकाला गेला आणि दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. विशेष म्हणजे, या दोघांमध्ये यापूर्वीही तणावाचे प्रसंग घडले होते. त्यामुळे ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या वादामागची पार्श्वभूमी, पूर्वीचे संबंध आणि कोणाच्या इशाऱ्यावरून हा प्रकार घडला, याचा तपास सुरू आहे. हाणामारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही पक्षांतील संबंधित व्यक्तींना ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांना अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या १०-१२ समर्थकांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी नितीन देशमुख यांना अटकेतून मुक्त करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच वेळी आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनीही पोलिस कारवाईचा तीव्र निषेध करत, अधिकाऱ्यांशी थेट वाद घातला. पोलिसांकडून होणारी ही कारवाई पक्षपाती असल्याचा आक्षेप रोहित पवार यांनी घेतला असून, त्यानंतरच त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत एफआयआर दाखल करण्यात आला.
भारताला झटका! चीनचे ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठ्या धरणाचे बांधकाम सुरू, बांगलादेशही चिंतेत
आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यामागची स्पष्ट कारणे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहित पवार यांनी सरकारी कामात अडथळा आणला, तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांशी असभ्य, उद्धट आणि असहकारपूर्ण वर्तन केले. या प्रकारचे कृत्य भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्ह्याच्या श्रेणीत येते, त्यामुळे कायदेशीर कारवाई आवश्यक ठरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींची विधाने आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणात कोणताही पक्षपात न करता कारवाई केली जात असल्याचा दावा केला आहे.






