Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी

CJP Bengaluru Protest : कर्नाटकात SIR प्रक्रियेविरोधात बेंगळुरूच्या फ्रीडम पार्कवर मोठं आंदोलन करण्यात आलं. ध्रुव राठी, प्रकाश राज यांच्यासह विविध सामाजिक आणि पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. मतदार याद्यांची SIR प्रक्रिया रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.

  • By विवेक
Updated On: Oct 08, 2026 | 06:39 PM
CJP Bengaluru Protest

CJP Bengaluru Protest

Follow Us
Follow Us:
  • बेंगळुरूच्या फ्रीडम पार्कवर SIR विरोधात मोठं आंदोलन आणि ‘जन-न्यायालय’ आयोजित.
  • ध्रुव राठी, प्रकाश राज आणि पारकला प्रभाकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती.
  • SIR रद्द करा, ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, अशा मागण्या
 

CJP Bengaluru Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता देशभरातून आंदोलनांना सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत आधी AISF यांच्याकडून तर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात INDIA आघाडीचे आंदोलन सुरु आहे. अश्यातच कॉकरोच जनता पार्टीकडूनही आधी मुंबईतील शिवाजी पार्क आणि आज बेंगळुरूमधील फ्रिडम पार्कवर मोठे आंदोलन करण्यात आले.

बंगळुरूच्या फ्रिडम पार्कवर आज (गुरुवार, 8 ऑकटोबर) मोठे आंदोलन पार पडले. मतदार याद्यांची SIR प्रक्रिया रद्द करावी, तसेच देशभरात पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात या मागण्यांसाठी निदर्शन मोर्चा आन ‘जनन्यायालय’ आयोजित करण्यात आले होते.

ध्रुव राठी, प्रकाश राजदेखील उपस्थित

या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. लोकप्रिय यूट्यूबर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ध्रुव राठी यांनी भारतातील अशा सार्वजनिक आंदोलनात पहिल्यांदाच सहभाग घेतला.

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

अभिनेते आणि कार्यकर्ते प्रकाश राज, राजकीय विश्लेषक पारकला प्रभाकर, ज्येष्ठ लेखक देवनूर महादेव आणि CJP संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे तरुण आणि Gen Z कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी झाली.

निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

आंदोलनातील वक्त्यांनी निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप केला. SIR प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचाही दावा करण्यात आला.

कर्नाटकातील सुमारे 5.5 कोटी मतदारांपैकी एक कोटीहून अधिक मतदारांची नावे वगळली जाण्याचा धोका असल्याचा दावा आयोजकांनी केला. मात्र, हे आंदोलनकर्त्यांचे आरोप असून त्यांची स्वतंत्र पडताळणी या वृत्तात करण्यात आलेली नाही.

जन- न्यायालयात मतदारांची बाजू ऐकणार

आंदोलनस्थळी ‘जन-न्यायालय’ (People’s Tribunal) देखील आयोजित करण्यात आलं. मतदार यादीतून नाव वगळण्यात आल्याचा दावा करणाऱ्या नागरिकांची बाजू या माध्यमातून ऐकून घेतली जाणार आहे.

या खंडपीठात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. गोपाला गौडा आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

‘SIR रद्द करा, मतपत्रिका परत आणा’

आंदोलकांनी हातात ‘ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करा’, ‘SIR रद्द करा’ आणि ‘मतपत्रिका परत आणा’ अशा मागण्यांचे फलक घेतले होते. तसेच भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि चे ग्वेरा यांच्या प्रतिमा असलेले बॅनर्सही आंदोलनस्थळी लावण्यात आले होते.

900 पोलिसांचा बंदोबस्त

मोठ्या संख्येने आंदोलक जमण्याची शक्यता लक्षात घेता बेंगळुरू पोलिसांनी फ्रीडम पार्क परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. कायदा आणि सुव्यवस्था तसेच शेषाद्री रोडवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुमारे 900 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीपासून SIR प्रक्रियेपर्यंत विविध मुद्द्यांवर देशभरात आंदोलनं सुरू असताना बेंगळुरूतील या आंदोलनामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे.

CJP Protest 10 October: १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी अभिजीत, सौरव आणि आशुतोषच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

Web Title: Cjp bengaluru protest bengaluru dhruv rathee prakash raj jan nyayalaya vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP Protest
  • Cockroach Janta Party
  • election commission of india
  • Gyanesh Kumar

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक
1

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
2

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

ध्रुव राठी आणि अभिजीत दीपके एकत्र! बंगळुरू-दिल्ली आंदोलनाने राजकीय वातावरण तापणार!
3

ध्रुव राठी आणि अभिजीत दीपके एकत्र! बंगळुरू-दिल्ली आंदोलनाने राजकीय वातावरण तापणार!

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’
4

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.