Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest Live Updates: अभिजीत दीपकेंच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेकडे!; व्हिडिओ संदेशातून मोठी घोषणा

CJP Protest Live Updates: दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला. आपल्यासह आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाच्या पुढील नेतृत्वाची घोषणा केली.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 10, 2026 | 03:22 PM
CJP Protest Live Updates: अभिजीत दीपकेंच्या अटकेनंतर CJP च्या आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेकडे!; व्हिडिओ संदेशातून मोठी घोषणा
Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत नेत्यांच्या धरपकडीनंतर CJP चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांचा प्री-रिकॉर्डेड व्हिडिओ संदेश प्रसिद्ध.
  • आशुतोष रांका, सौरव दास व दीपके यांच्या स्थानबद्धतेनंतर आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेकडे.
  • अजिंक्य शिंदे CJP चे राष्ट्रीय संघटक प्रभारी असून ते दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणार.
CJP Protest Live Updates: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची तयारी करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिपके यांच्यासह आशुतोष रांका आणि सौरव दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या घडा मोडींमुळे दिल्लीतील जंतरमंतर येथे नियोजित आंदोलनाच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांचे पथक विमानात दाखल झाले. त्यानंतर दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना बसमधून अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचाही दावा केला जात आहे. मात्र, या तिघांना औपचारिकरीत्या अटक करण्यात आली आहे का, तसेच त्यांना कोणत्या ठिकाणी नेण्यात आले, याबाबत अधिकृत पुष्टी आवश्यक आहे.

LIVE CJP Protest LIVE Updates: सीजेपी नेत्यांच्या अटकेनेंतर आंदोलनाचे नेतृत्तव अजिंक्य शिंदेंकडे

CJP च्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह

कॉकरोच जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तामुळे जंतरमंतर येथील आंदोलनाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य नेते पोलिसांच्या ताब्यात असल्याने आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी एक व्हिडीओ शेअर करून महत्त्वाची घोषणा केल्याचे सांगण्यात येत आहे. आपण पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्यांनी CJP च्या नव्या नेत्याचे नाव जाहीर केल्याचा दावा केला जात आहे. आता या नव्या नेत्याची भूमिका काय असेल आणि जंतरमंतरवरील नियोजित आंदोलन पुढे सुरू राहणार का, याकडे लक्ष लागले आहे.

आभिजीत दिपके यांच्यासह आशुतोष रांका आणि सौरव दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या घडामोडीनंतर अभिजीत दिपके यांनी व्हिडीओ शेअर करत आंदोलनाच्या नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य शिंदे याच्याकडे सोपवली आहे.

Donald Trump US Farmers Crisis : ट्रम्पच्या धोरणांना अमेरिकन शेतकरीही त्रस्त! खते आणि डिझेलचे भाव 67% नी वाढले

अजिंक्य शिंदे करणार आंदोलनाचे नेतृत्व

दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला. आपल्यासह आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाच्या पुढील नेतृत्वाची घोषणा केली.

“सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदे हा करेल. आशुतोष रांका, सौरव दास आणि मला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आमच्या तिघांनंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचे नेतृत्व करेल. तुम्ही माझा हा व्हिडीओ बघत असाल, तर अजिंक्य शिंदे याच्या मार्गदर्शनानुसार काम करा. आमच्या तिघांनंतर आंदोलनाची सूत्रे तो सांभाळेल,” असे अभिजीत दिपके यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

जंतरमंतरवरील आंदोलनाकडे लक्ष

मुख्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्तामुळे जंतरमंतर येथे नियोजित आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, अभिजीत दिपके यांनी अजिंक्य शिंदे याच्याकडे नेतृत्व सोपवल्याची घोषणा केल्याने आंदोलनाची सूत्रे आता त्याच्याकडे असणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची भूमिका घेतलेल्या CJP चे पुढील आंदोलन कशा पद्धतीने होणार आणि अजिंक्य शिंदे कार्यकर्त्यांना कसे मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, तिघांना ताब्यात घेण्याची नेमकी कारणे आणि त्यांच्या कायदेशीर स्थितीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

 

Web Title: Cjp chief abhijeet dipke names ajinkya shinde to lead protest in video message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP
  • Delhi Police
  • Election Commission
  • Jantar Mantar
  • National Politics

संबंधित बातम्या

CJP Protest Live Updates:  अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत?  विमानात हायव्होल्टेज ड्रामा
1

CJP Protest Live Updates: अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत? विमानात हायव्होल्टेज ड्रामा

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!
2

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!

CJP Protest LIVE Updates: सीजेपी नेत्यांच्या अटकेनेंतर आंदोलनाचे नेतृत्तव अजिंक्य शिंदेंकडे
3

CJP Protest LIVE Updates: सीजेपी नेत्यांच्या अटकेनेंतर आंदोलनाचे नेतृत्तव अजिंक्य शिंदेंकडे

CJP Protest : दिल्ली राडा होणार! आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची 35 हजारांची फौज तैनात; CCTV, ड्रोन आणि FRS चा करणार वापर
4

CJP Protest : दिल्ली राडा होणार! आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची 35 हजारांची फौज तैनात; CCTV, ड्रोन आणि FRS चा करणार वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.