Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest Live Updates: अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत? विमानात हायव्होल्टेज ड्रामा

CJP Protest Live Updates: अभिजीत दीपके आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. विमानात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर अभिजीत दीपके यांनी आक्षेप घेतला. एक महिला पोलीस अधिकारी त्यांना ताब्यात घेण्यासाठी आल्या होत्या.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 10, 2026 | 01:10 PM
Abhijeet Dipke Delhi Airport, CJP Protest Flight Drama,

Abhijeet Dipke Delhi Airport, CJP Protest Flight Drama,

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील IGI विमानतळावर विमानात चढून पोलिसांनी CJP अध्यक्ष अभिजीत दीपके यांना घेतले ताब्यात.
  •  सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही विमानातील नाट्यमय घडामोडींनंतर पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • “मी अटक व्हायलाच आलोय, मला अटक करा”; दीपके यांचा विमानातच पोलिसांवर संताप व घोषणाबाजी.
CJP Protest Live Updates:  कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके, प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासह, शनिवारी (10 ऑक्टोबर)  दिल्लीत दाखल झाल्यानंतर काही क्षणांतच त्यांना ताब्यात घेण्यात आले. ते जंतर मंतर येथे नियोजित आंदोलनासाठी दिल्लीत दाखल होताच विमानतळावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार,  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मतदार यादी सुधारणा प्रक्रिया (SIR) आणि निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारासंदर्भात सीजेपीने १० ऑक्टोबरला आंदोलनाची हाक दिली आहे. त्या आंदोलनासाठी आज सकाळी अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास आणि इतर सहकारी  दिल्ली विमानतळावर दाखल झाले. पण काही मिनिटांपूर्वीच आयजीआय विमानतळावर उतरलेल्या अभिजीत दीपके यांना घेऊन जाणाऱ्या विमानात दिल्ली पोलिसांचे जवान चढले. अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांना सांगितले, यावेळी विमानात मोठा ड्रामाच झाल्याचे पाहाला मिळाले.

Delhi CJP Protest Live Updates: दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!

दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना  सोबत येण्याची विनंती केली.  त्यावर, मी येथे अटक होण्यासाठीच आलो आहे. मला अटक करा.”  असा संतापच त्यांनी दिल्ली पोलिसांसमोर व्यक्त केला. त्यावर  “नाही, ही अटक नाही. कृपया सहकार्य करा.” अशी प्रतिक्रीया दिल्ली पोलिसांनी दिला. पोलिसांनी त्या तिघांना विमानातून उतरवून बसमध्ये नेले. सीजेपीने अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेचा निषेध केला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी दिल्लीत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

सूत्रांनुसार, अभिजीत दीपके आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. विमानात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर अभिजीत दीपके यांनी आक्षेप घेतला. एक महिला पोलीस अधिकारी त्यांना ताब्यात घेण्यासाठी आल्या होत्या. महिला पोलीस अधिकाऱ्यांना पाहताच अभिजीत दीपके उभे राहिले आणि त्यांनी हात जोडले. त्यानंतर दीपके म्हणाले, “चला, मी अटक करून घेण्यासाठी आलो आहे.” “भारत माता की जय” आणि “इन्किलाब जिंदाबाद”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले.

विमानात बराच गोंधळ

विमानातील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिजीत दीपके महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रश्न विचारताना दिसत आहेत. ते विचारतात, “तुम्ही विमानात कशा आलात? तुमच्या पुरुष अधिकाऱ्यांना पुढे पाठवा.” दरम्यान, महिला पोलीस अधिकारी आग्रह करत होत्या, “चला.” त्याचवेळी, आशुतोष रांका यांनी विचारले, “महिला पोलीस अधिकारी का येत आहेत? तुमच्या पुरुष अधिकाऱ्यांना पाठवा.” अभिजीत दीपके यांनी उत्तर दिले, “अहो, मी अटक करून घेण्यासाठी आलो आहे. मला माझी बॅग घेऊ द्या. तुम्ही मला कोणत्या तुरुंगात टाकणार आहात?”

LIVE CJP Protest LIVE Updates: सीजेपी’चे अध्यक्ष अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं

अभिजीत दीपके आता कुठे आहेत?

यानंतर, दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने त्यांना ताब्यात घेऊन एका नजरकैद केंद्रात नेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तिघांना विमानतळावरून नेण्यात आले. पोलिसांनी त्यांना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून वाचवत नजरकैद केंद्रापर्यंत नेल्याची माहिती आहे. त्या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. ते नजरकैद केंद्रातच राहतील, परंतु त्यांना एका दुर्गम ठिकाणी नेण्यात आले आहे.

नजरकैदेचा सीजेपीकडून निषेध

दरम्यान, सीजेपी, म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीने, या कारवाईला त्यांच्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचा दावा करत तिन्ही नेत्यांच्या तात्काळ आणि बिनशर्त सुटकेची मागणी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) नावाखाली मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आणि ‘फॉर्म ६’ या मतदार नोंदणी दस्तऐवजातील बदलांना दोन सहकारी निवडणूक आयुक्तांनी केलेला विरोध डावलल्याचा आरोप आहे. याच मुद्द्यावरून मुख्य न्यायमूर्तींनी जंतर मंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे.

 

Web Title: Cjp chief abhijit dipke detained inside flight at delhi airport ahead of protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Breaking News
  • CJP
  • Delhi airport
  • Delhi Police
  • Election Commission
  • Jantar Mantar
  • National Politics

संबंधित बातम्या

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!
1

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!

CJP Protest LIVE Updates: सीजेपी’चे अध्यक्ष अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
2

CJP Protest LIVE Updates: सीजेपी’चे अध्यक्ष अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं

CJP Protest : दिल्ली राडा होणार! आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची 35 हजारांची फौज तैनात; CCTV, ड्रोन आणि FRS चा करणार वापर
3

CJP Protest : दिल्ली राडा होणार! आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची 35 हजारांची फौज तैनात; CCTV, ड्रोन आणि FRS चा करणार वापर

CJP Protest : दिल्ली पोलिसांचा CJP ला झटका! आंदोलनाची परवानगी नाकारली, केंद्राने सर्व राज्यांना दिले महत्वाचे निर्देश
4

CJP Protest : दिल्ली पोलिसांचा CJP ला झटका! आंदोलनाची परवानगी नाकारली, केंद्राने सर्व राज्यांना दिले महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.