Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी CJP कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक; धर्मेंद्र प्रधानांनंतर आता लागणार गडकरींचा नंबर?

नीट आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये कोअर कमिटी बैठक होत आहे. अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या पुढील भूमिकेसह E20 इंधनाच्या मुद्द्यावर महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 02, 2026 | 03:19 PM
अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी CJP ची कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक

अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी CJP ची कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये CJPची कोअर कमिटी बैठक
  • E 20 इंधन आणि पुढील आंदोलनांवर रणनीती ठरणार
  • अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण निर्णयांची शक्यता
 

नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनानंतर राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या संघटनात्मक हालचालींना आता वेग आला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी बुधवारी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, आगामी राजकीय आणि सामाजिक भूमिका निश्चित करण्यासाठी ही बैठक निर्णायक मानली जात आहे.

या बैठकीला देशभरातील सुमारे १५ ते २० प्रमुख सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीसाठी संबंधित सदस्यांना निमंत्रण आणि संदेश पाठवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर पक्षाची ही पहिली मोठी संघटनात्मक बैठक असल्यामुळे तिच्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर CJP कडे देशभरातून लक्ष

नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनामुळे CJP ला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आंदोलनानंतर तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्ष आणि अभिजीत दिपके यांची चर्चा अधिक वाढली. दरम्यान, आंदोलनानंतर दिपके यांची प्रकृतीही बिघडली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.

‘लाठीमारामुळे आंदोलन आणखी मोठं झालं’; जंतर-मंतर आंदोलनावर अभिजीत दिपकेंचं मोठं विधान

याच काळात पक्षाला विदेशातून आर्थिक मदत मिळाल्याचा आरोप करत काही व्यक्तींनी चौकशीची मागणी केली. अभिजीत दिपके यांना परदेशात शिक्षणासाठी किंवा वास्तव्यासाठी निधी नेमका कुठून मिळाला, तसेच त्यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काही स्तरांतून करण्यात आली आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणांकडे पत्र देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, या आरोपांबाबत अधिकृत चौकशीचा निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

E20 इंधनासह राष्ट्रीय मुद्द्यांवर CJPची रणनीती

दरम्यान, आजच्या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर, संघटन विस्तारावर आणि आगामी आंदोलनांच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः E20 इंधन या मुद्द्यावर पक्ष आक्रमक भूमिका घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजिनाम्यानंतर आता नितीन गडकरींचा नंबर लागतो काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून महायुतीत खळबळ? बच्चू कडू, संजय शिरसाट यांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी

याशिवाय, आंदोलनानंतर निर्माण झालेल्या जनाधाराचे संघटनात्मक बळात रूपांतर करण्यासाठीही काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. बैठकीनंतर अभिजीत दिपके पक्षाची पुढील दिशा, आगामी कार्यक्रम आणि विविध राष्ट्रीय मुद्द्यांवरील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असून, या बैठकीतील निर्णयांकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.

Web Title: Cjp core committee meeting at abhijit dipke residence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
1

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
2

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप
3

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी
4

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.