Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्य विभागाच्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री वॉररुमची स्थापना करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: May 19, 2026 | 05:05 PM
CM Devendra Fadnavis meeting at Sahyadri Guest House

CM Devendra Fadnavis meeting at Sahyadri Guest House

Follow Us
Follow Us:
  • सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक
  • आरोग्य विभागाच्या तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा
  • बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित
सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री वॉररुमची स्थापना करण्यात आली आहे. या वॉररुम अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाच्या तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित होत्या. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या या आढावा बैठकीत या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पायाभूत आरोग्य सुविधा बळकटीकरण, प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर मिशन, नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी तसेच केंद्र सरकारने सुरू केलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहीम आदींसह विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्यसेवा परिणामकारक, दर्जेदार आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत प्रधानमंत्री आयुष्मान आरोग्य मंदिर, क्रिटिकल केअर ब्लॉक आणि प्रयोगशाळांच्या उभारणीची कामे निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिले.

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांना गती देण्यात येत असून या यंत्रणा लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत नमूद केले. महापालिका आणि नगरपालिकांशी संबंधित प्रलंबित बाबींमध्ये नगरविकास विभागाने अधिक जबाबदारीने काम करत त्यात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. तसेच सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून प्रकल्पांची अंमलबजावणी जलद गतीने करावी असेही एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले.

“लोकांनी महागाईमुळे त्रास सहन करा किंवा जय श्रीराम म्हणा,” संजय राऊत यांची मोदी सरकारवर आगपाखड

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, आयुक्त कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महाराष्ट्र 1st कॉन्क्लेव 2026 चे आयोजन

महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ‘महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ‘महाराष्ट्र 1st कॉन्क्लेव 2026 – The Magnetic Maharashtra’ चा चौथ्या आवृत्तीचे मंगळवार, 19 मे 2026 रोजी ताज प्रेसिडेंट, कफ परेड, मुंबई येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. “Magnetic Maharashtra – Where Growth Attracts the World” या संकल्पनेवर आधारित हा कॉन्क्लेव राज्याच्या वाढत्या औद्योगिक, पायाभूत आणि गुंतवणूक क्षमतेचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करणार आहे. या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद का झाला? पात्र असूनही खात्यात पैसे न आल्याने महिलांचा संताप!

Web Title: Cm devendra fadnavis meeting at sahyadri guest house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
3

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis On Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.