Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! वळसे पाटलांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; भेटीचं कारण आलं समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही. काही क्षणांसाठी संपूर्ण वातावरण आनंदमय झाले आणि उपस्थितांनी या प्रसंगाचा मनमुराद आनंद घेतला. मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी या प्रसंगाचा आनंद घेतल्याने काही काळ वातावरण हलकेफुलके आणि उत्साहपूर्ण झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 14, 2026 | 12:31 PM
मोठी बातमी ! वळसे पाटलांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; भेटीचं कारण आलं समोर

मोठी बातमी ! वळसे पाटलांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; भेटीचं कारण आलं समोर

Follow Us
Follow Us:

मंचर : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील विविध विकासकामांची पाहणी आणि दर्शन आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सायंकाळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. अनौपचारिक स्वरूपाच्या या भेटीत राजकीय, सामाजिक तसेच विकासकामांशी संबंधित विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या.

मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, सतीश बेंडे यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंबेगाव तालुक्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख असलेल्या मासवडी, खिचडी, पकोडे आणि मिठाईचा आस्वाद घेतला.

यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील आणि शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि आकर्षक जॅकेट देऊन सन्मान करण्यात आला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली साताऱ्यात उदयनराजे यांची भेट, आगामी राजकीय समीकरणांवर चर्चा

दरम्यान, स्नेहभोजनानंतर सुरू असलेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांना गोवर्धन उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांचा परिचय करून दिला. परिचय करून देताना त्यांनी केलेल्या मिश्कील टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही. काही क्षणांसाठी संपूर्ण वातावरण आनंदमय झाले आणि उपस्थितांनी या प्रसंगाचा मनमुराद आनंद घेतला. मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी या प्रसंगाचा आनंद घेतल्याने काही काळ वातावरण हलकेफुलके आणि उत्साहपूर्ण झाले. अल्पावधीत करण्यात आलेल्या भोजन व स्वागत व्यवस्थेचेही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष कौतुक केले.

‘अरे अरे गोपीचंद…काय रे तुझा छंद…’ राष्ट्रवादी शरद पवार गटाची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका

Web Title: Cm devendra fadnavis visited dilip walse patil residence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Dilip Walase Patil

संबंधित बातम्या

भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’, फडणवीसांच्या ‘काँग्रेस बुडते जहाज’ टीकेवर काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर
1

भाजपा मित्रपक्ष गिळणारी ‘चेटकीण’, फडणवीसांच्या ‘काँग्रेस बुडते जहाज’ टीकेवर काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : भूमिहीन शेतकरी कुटुंबाला दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांकडून आर्थिक मदतीसह बैल भेट
2

Devendra Fadnavis : भूमिहीन शेतकरी कुटुंबाला दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांकडून आर्थिक मदतीसह बैल भेट

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! मंत्रालयीन विभागांची होणार पुनर्रचना, प्रशासकीय विभागांची संख्या वाढणार
3

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! मंत्रालयीन विभागांची होणार पुनर्रचना, प्रशासकीय विभागांची संख्या वाढणार

ठाणेकरांसाठी खुशखबर ! गायमुख ते फाउंटन बोगद्याला मान्यता, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालादेखील मंजुरी
4

ठाणेकरांसाठी खुशखबर ! गायमुख ते फाउंटन बोगद्याला मान्यता, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालादेखील मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.