Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझा सिनेमा आला तर त्यात माझी भूमिका…! कोणत्या अभिनेत्यावर CM फडणवीसांनी दाखवला विश्वास?

देवेंद्र फडणवीस यांनी सिनेमा आणि नाटक या विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिक चित्रपटावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 13, 2026 | 11:59 AM
CM Devendra Fadnavis wishes that Prasad Oak should play his role in the film

CM Devendra Fadnavis wishes that Prasad Oak should play his role in the film

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत चर्चेत
  • फडणवीसांच्या चित्रपटामध्ये कोण साकारणार त्यांची भूमिका
  • प्रसाद ओकने साकारावी अशी इच्छा व्यक्त केली
Devendra Fadnavis : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची (Maharashtra Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून सर्वच राजकीय दिग्गज मैदानात उतरले आहेत. जोरदार सभा, भाषण आणि मुलाखती दिल्या जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी सिनेमा आणि नाटक या विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिक चित्रपटावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये नाटक की सिनेमा याबाबत मत मांडले. फडणवीस म्हणाले की, “अलिकडच्या काळामध्ये फार काही नाटक बघायला वेळ मिळत नाही. मी नाटकं बघतो आहे फक्त ती कलाकारांची नाही. मी राजकारणातील नाटक बघतो सुद्धा आहे आणि करतो सुद्धा आहे. आता काय सांगू? पूर्वी खूप नाटक बघत होतो. त्यावेळी आवडलेले एक नाटक म्हणजे सही रे सही. म्हणजे मी फार गंभीर माणूस नाही. मला हलक फुलक आवडतं, त्यामुळे मला सही रे सही हे नाटक खूप आवडलं होतं. ते माझ्या मनामध्ये नेहमी असतं. आणि अजूनही पाहण्याची माझी इच्छा होते,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

पुढे फडणवीस म्हणाले की, “लहान असताना मला नाटक पाहण्याची आवड निर्माण झाली कारण मी तो मी नव्हेच हे नाटक मी पाहिलं होतं. ते समजण्याचं माझं वय सुद्धा नव्हतं पण ते मला इतकं आवडलं होतं की तेव्हापासून मी मराठी नाटक बघू लागलो. खूप नाटक त्यानंतर पाहिली. राजकारणतही नाटकं पाहिली आणि आता त्यांना याबाबत विचारलं तर ते म्हणतात की तो मी नव्हेच,” असा टोला देखील फडणवीसांनी लगावला.

हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंकडून माझे १ लाख रुपये घेऊन या….: ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीसांचा पलटवार

एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या चित्रपटाबाबत देखील विचारण्यात आले. फडणवीसांनी त्यांच्या चित्रपटाबाबत इच्छा बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझा कधी सिनेमा आला तर त्यामध्ये अभिनेता प्रसाद ओक माझी भूमिका योग्यपणे करु शकतात. त्यामुळे या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. यापूर्वी शिवसेनेतील राजकारण आणि आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्यात आला आहे. धर्मवीर आणि धर्मवीर 2 या चित्रपटांमध्ये आनंद दिघे यांची भूमिका देखील अभिनेता प्रसाद ओकने निभावली. अत्यंत गाजलेल्या या चित्रपटातील प्रसाद ओकच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाले. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांची भूमिका प्रसाद ओकने करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Web Title: Cm devendra fadnavis wishes that prasad oak should play his role in the film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • political news
  • prasad oak

संबंधित बातम्या

‘पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्…’; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप
1

‘पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्…’; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा
2

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली
3

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली

Maharashtra politics : 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार? मुख्यमंत्र्यांबाबत बड्या नेत्याचं विधान, राजकीय चर्चांना उधाण
4

Maharashtra politics : 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार? मुख्यमंत्र्यांबाबत बड्या नेत्याचं विधान, राजकीय चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.